JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IPL 2023 MI vs SRH : कॅमेरुन ग्रीनच दमदार शतक; मुंबई इंडियन्सचा होमग्राउंडवर दणदणीत विजय

IPL 2023 MI vs SRH : कॅमेरुन ग्रीनच दमदार शतक; मुंबई इंडियन्सचा होमग्राउंडवर दणदणीत विजय

आयपीएल 2023 मधील 69 वा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद यांच्यात पारपडला. यासामन्यात मुंबई इंडियन्सने हैदराबादचा पराभव केला.

जाहिरात

कॅमेरुन ग्रीनच दमदार शतक, मुंबई इंडियन्सचा होमग्राउंडवर दणदणीत विजय

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 21 मे : आयपीएल 2023 मधील 69 वा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद यांच्यात पारपडला. यासामन्यात मुंबई इंडियन्सने हैदराबादचा पराभव केला. मुंबई इंडियन्सने सनरायजर्स हैद्राबादवर ८ विकेट्सने विजय मिळवला असून प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी आपले आव्हान कायम ठेवले आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियम मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद यांच्यात सामना रंगला होता. यात मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा याने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्यावेळी  प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या सनरायजर्स हैदराबादने 20 ओव्हरमध्ये 5 विकेट्स घालवून 200 धावा केल्या. सनरायजर्स हैदराबादकडून विवरंत शर्माने 69, मयंक अग्रवालने 83, हेन्रीचं क्लासेनने 18, एडम मार्करमने 13 धावा केल्या. तर मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांपैकी आकाश मढवलने 4, ख्रिस जॉरडनने 1 विकेट घेतली. मुंबई इंडियन्सला विजयासाठी 201 धावांचे आव्हान मिळाल्यानंतर ईशान किशन आणि कर्णधार रोहित शर्मा यांची सलामी जोडी मैदानात आली. कर्णधार रोहित शर्माने आपल्या संघासाठी धावा करताना अर्धशतक ठोकले. जे रोहितचे आयपीएलमधील 41 वे अर्धशतकं होते. ईशान किशनची विकेट गेल्यावर कॅमरुन ग्रीन मैदानात आला आणि त्याने चौफेर फटकेबाजी करायला सुरुवात केली. कॅमरुन ग्रीन या सामन्यात त्याचे आयपीएल मधील पहिले शतक ठोकले. मुंबई इंडियन्सकडून कॅमरुन ग्रीनने 100, रोहित शर्माने 56, सूर्यकुमार यादवने 25 तर ईशान किशनने 14 धावा केल्या. अखेर 2 ओव्हर आणि 8 विकेट्स शिल्लक ठेऊन मुंबईने हा सामना जिंकला.

मुंबई इंडियन्सने या विजयासह आयपीएल 2023 च्या प्लेऑफमध्ये जाण्यासाठी आपले आव्हान कायम ठेवले आहे. आयपीएल 2023 च्या पॉईंट टेबलमध्ये मुंबई इंडियन्सचा संघ 16 पॉईंट्स सह चौथ्या स्थानावर पोहोचला आहे. आज ७० व्या सामन्यात आरसीबीचा गुजरात टायटन्सकडून पराभव झाल्यास मुंबई इंडियन्सची प्लेऑफमध्ये एंट्री होऊ शकते. यापूर्वी गुजरात टायटन्स, चेन्नई सुपरकिंग्स, लखनौ सुपर जाएंट्स हे संघ आयपीएल 2023 च्या प्लेऑफमध्ये पोहोचले आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या