अर्जुननं लक्ष्य भेदलं, यॉर्कर टाकत पंजाबला दिला मोठा धक्का, Video
मुंबई, 22 एप्रिल : आयपीएल 2023 मध्ये 31 वा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्स यांच्यात खेळावला जात आहे. मुंबईच्या होम ग्राउंडवर पारपडत असलेल्या या सामन्यात अर्जुन तेंडुलकरने त्याची पहिली विकेट घेतली आहे. अर्जुनने भेदक यॉर्कर टाकत पंजाब किंग्सच्या संघाला मोठा धक्का दिला. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्स यांच्यात सामना खेळवला जात असून या सामन्यात सुरुवातीला कर्णधार रोहित शर्माने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. या निर्णयानंतर पंजाब किंग्सकडून मॅथ्यू शॉर्ट आणि प्रभसिमरन सिंह हे दोघे फलंदाजीसाठी मैदानात आले. कॅमेरून ग्रीनने तिसऱ्या ओव्हरमध्ये मॅथ्यू शॉर्टची विकेट घेतल्यावर मैदानात उपस्थित असलेला प्रभसिमरन सिंह हा खेळाडू मैदानावर चौफेर फटकेबाजी करत होता. परंतु प्रभसिमरन सिंहला बाद करण्यात अर्जुन तेंडुलकर ला यश आले.
सातव्या ओव्हरमध्ये अर्जुन तेंडुलकरने भेदक यॉर्कर टाकला. हा यॉर्कर खेळणे प्रभसिमरन सिंहला शक्य झाले नाही आणि तो एलबी डब्ल्यू होऊन बाद झाला. यानंतर अर्जुनच्या भेदक गोलंदाजीचा नमुना पुन्हा एकदा जगाने पहिला. प्रभसिमरन सिंहची विकेट मुंबईच्या होम ग्राऊंडवरील अर्जुन तेंडुलकरची पहिली तर आयपीएल कारकिर्दीतील दुसरी विकेट ठरली. यापूर्वी अर्जुनने हैद्राबाद विरुद्धच्या सामन्यात भूवनेश्वर कुमारला बाद करत आयपीएलमधील पहिली विकेट घेतली होती.