JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IPL 2023 : बंगळुरुमध्ये पुरनच वादळ! लखनऊचा आरसीबीवर थरारक विजय

IPL 2023 : बंगळुरुमध्ये पुरनच वादळ! लखनऊचा आरसीबीवर थरारक विजय

आज आयपीएल 2023 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बँगलोर विरुद्ध लखनऊ सुपर जाएंट्स यांच्यात सामना खेळवला गेला. या सामन्यात आरसीबीचा त्यांच्या होम ग्राऊंडमध्ये पराभवाला सामोरे जावे लागेल असून लखनऊ जाएंट्सने या सामन्यात विजय मिळवला आहे.

जाहिरात

होम ग्राउंडवर आरसीबीला चारली पराभवाची धूळ! रोमांचक सामन्यात लखनऊला दणदणीत विजय

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 10 एप्रिल : आज आयपीएल 2023  मध्ये रॉयल चॅलेंजर्स बँगलोर विरुद्ध लखनऊ सुपर जाएंट्स यांच्यात सामना खेळवला गेला. या सामन्यात आरसीबीचा त्यांच्या होम ग्राऊंडमध्ये पराभवाला सामोरे जावे लागेल असून लखनऊ जाएंट्सने या सामन्यात विजय मिळवला आहे. लखनऊने या सामन्यात 1 विकेट्सने विजय मिळवला असून निकोलस पूरन हा मॅच विनर खेळाडू ठरला आहे. आरसीबी चे होम ग्राउंड असलेल्या बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर आज रॉयल चॅलेंजर्स बँगलोर विरुद्ध लखनऊ सुपर जाएंट्स यांच्यात सामना सुरु आहे. या सामन्यात सुरुवातीला लखनऊचा कर्णधार के एल राहुलने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. यावेळी आरसीबीकडून प्रथम फलंदाजीसाठी विराट कोहली आणि कर्णधार फाफ डू प्लेसिसची जोडी मैदानात आली. यावेळी विराट कोहली आणि प्लेसिसने तुफान फटकेबाजी करत मैदान गाजवले. विराट कोहलीने 44 चेंडूत 61 धावा केल्या. तर प्लेसिसने 46 चेंडूत 79 धावा केल्या.  कोहली बाद झाल्यानंतर मैदानात आलेलया मॅक्सवेलने देखील 29 चेंडूत 59 धावा केल्या.

आरसीबीने 20 ओव्हरमध्ये 2 विकेट्स घालवून 212 धावा केल्या. लखनऊ सुपर जाएंट्सला विजयासाठी 20 ओव्हरमध्ये 213 धावांचे आव्हान दिले . हे आव्हान पूर्ण करत असताना लखनऊची सुरुवात खराब झाली. आरसीबीच्या सिराजने मेयर्सला शून्य धावांवर बाद केले. त्यानंतर दीपक हुडा आणि कृणाल पांड्याची देखील स्वस्तात विकेट पडली. त्यानंतर कर्णधार के एल राहुल देखील 18 धावा करून बाद झाला. परंतु या दरम्यान निकोलस पुरनची वादळी खेळी लखनऊसाठी फायदेशीर ठरली. Virat Kohli : विराट कोहलीने केला होता शीळ अन्न खाण्याचा हट्ट, 5 स्टार हॉटेलच्या शेफने सांगितला तो किस्सा निकोलस पुरनने 18 चेंडूत 62 धावा करण्याचा पराक्रम केला. त्याने या सामन्यात केवळ 15 चेंडूत 51 धावा ठोकून आपले अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतर मार्कस स्टॉइनिसने 65, आयुष बडोनी यांनी 30 धावा केल्या. शेवटच्या ओव्हरमध्ये सामना अतिशय रोमांचक बनला आणि अखेर  लखनऊ सुपर जाएंट्स या आरसीबीवर 1 विकेट्सने विजय मिळवला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या