JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IPL 2023 : 670 जणांवर एकटा पडला भारी, विराट-रोहित-गेलच्याही पुढे, आता कॅप्टनच टेन्शनमध्ये!

IPL 2023 : 670 जणांवर एकटा पडला भारी, विराट-रोहित-गेलच्याही पुढे, आता कॅप्टनच टेन्शनमध्ये!

आयपीएल 2023 मध्ये लखनऊ सुपर जाएंट्सने आतापर्यंत 2 मॅच खेळल्या आहेत, यातल्या एका सामन्यात टीमचा विजय झाला तर दुसऱ्यात पराभव.

जाहिरात

एक खेळाडू 670 जणांवर पडला भारी, आता कॅप्टनच धर्मसंकटात

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 7 एप्रिल : आयपीएल 2023 मध्ये लखनऊ सुपर जाएंट्सने आतापर्यंत 2 मॅच खेळल्या आहेत, यातल्या एका सामन्यात टीमचा विजय झाला तर दुसऱ्यात पराभव. केएल राहुलच्या नेतृत्वात खेळणाऱ्या लखनऊचा पुढचा सामना आज सनरायजर्स हैदराबादविरुद्ध होणार आहे. एडन मार्करम, हेनरिक क्लासेन आणि मार्को येनसनच्या आगमनामुळे हैदराबादची टीम आणखी मजबूत झाली आहे, त्यामुळे लखनऊसाठी हैदराबादचं आव्हान सोपं नसणार आहे. याशिवाय लखनऊसमोर सगळ्यात मोठं आव्हान त्यांच्याच टीममधल्या खेळाडूने ठेवलं आहे. क्विंटन डिकॉकच्या गैरहजेरीत लखनऊ सुपर जाएंट्सने पहिल्या दोन सामन्यांमध्ये वेस्ट इंडिजचा ओपनर काईल मायर्सला ओपनिंगची संधी दिली. मेयर्सने त्याच्या पहिल्याच सामन्यात खणखणीत अर्धशतक ठोकलं, यानंतर दुसऱ्या सामन्यातही त्याने अर्धशतक केलं. आयपीएलच्या आतापर्यंतच्या 16 मोसमांमध्ये 671 खेळाडू खेळले आहेत, यातला मायर्स हा एकमेव खेळाडू आहे, ज्याने त्याच्या पहिल्या दोन्ही सामन्यांमध्ये अर्धशतक केलं. काईल मेयर्सने लखनऊसाठी आपल्या पहिल्याच आयपीएल सामन्यात 38 बॉलमध्ये 73 रन ठोकले, यानंतर सीएसकेविरुद्धही त्याने वादळी खेळी केली. मायर्से 22 बॉलमध्ये 240 च्या स्ट्राईक रेटने 53 रन ठोकले. काईल मायर्स 2021 च्या आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सच्या टीममध्ये राखीव खेळाडू म्हणून होता. पण कोरोनामुळे आयपीएलचा मोसम अर्ध्यातच थांबवण्यात आला, त्यानंतर युएईमध्ये आयपीएल खेळवली गेली, तेव्हा त्याला तिकडे बोलावण्यात आलं नाही. 2022 साली लखनऊने मायर्सला 50 लाख रुपयांमध्ये विकत घेतलं, पण त्याला एकही मॅच खेळण्याची संधी दिली नाही. जर क्विंटन डिकॉक दक्षिण आफ्रिकेकडून खेळत नसता तर या मोसमातही मायर्सला खेळण्याची संधी मिळाली नसती. मायर्सने वाढवलं राहुलचं टेन्शन मायर्सने पहिल्या दोन सामन्यांमध्ये आक्रमक बॅटिंग केल्यामुळे त्याचा कर्णधार केएल राहुल याचंच टेन्शन वाढलं आहे. मेयर्सने केएल राहुलसोबतच टीमचा मेंटर गौतम गंभीरलाही धर्मसंकटात टाकलं आहे. मागच्या मोसमात राहुलसोबत क्विंटन डिकॉकने ओपनिंगला बॅटिंग केली होती. आता डिकॉकच्या आगमानामुळे ओपनिंगला कोण खेळणार, ही मिस्ट्री राहुल आणि गंभीरला सोडवायची आहे. काईल मायर्सने त्याच्या करियरची सुरूवात लोअर ऑर्डर बॅटर म्हणून केली होती, पण नंतर तो ओपनिंगला खेळायला लागला. 2022 नंतर मेयर्सने पॉवरप्लेमध्ये 138 च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग केली आहे. तर याच काळात डिकॉक 139 च्या स्ट्राईक रेटने खेळला आहे. मेयर्स आणि डिकॉक सीपीएल आणि SA20 मध्येही एकाच टीमकडून खेळत आहेत, तेव्हा मेयर्स ओपनिंगला येत असल्यामुळे डिकॉक मधल्या फळीत खेळायचा. लखनऊने हैदराबादविरुद्धच्या सामन्यात मेयर्स आणि डिकॉक या दोघांना खेळवलं तर मार्कस स्टॉयनिसला बाहेर बसावं लागू शकतं. तर निकोलस पूरन तिसरा आणि मार्क वूड चौथा परदेशी खेळाडू असेल. डिकॉकने 12 दिवसांपूर्वीच टी-20 सामन्यात 44 बॉलमध्ये शतक ठोकलं. दुसरीकडे मेयर्स पॉवरप्लेमध्येही बॉलिंग करू शकतो, तसंच बॉल इनस्विंग आणि आऊटस्विंग करण्याची क्षमताही त्याच्यात आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या