कोलकाताला मिळाली श्रेयस अय्यरची रिप्लेसमेंट! धाकडं फलंदाजाला दुप्पट किंमत देऊन घेतलं संघात
मुंबई, 5 एप्रिल : जगप्रसिद्ध इंडियन प्रीमियर लीगच्या 16 व्या सीजनला सुरुवात झाली आहे. हा सीजन सुरु होऊन काहीच दिवस झाले असताना कोलकाता नाइट रायडर्सचा कर्णधार श्रेयस अय्यर दुखापतीच्या कारणामुळे यंदा आयपीएलच्या संपूर्ण सीजनमधून बाहेर पडला आहे. तेव्हा कोलकाता नाइट रायडर्सने आज श्रेयसला रिप्लेस करणाऱ्या खेळाडूच्या नावाची घोषणा केली आहे. भारतीय संघासह आयपीएल च्या केकेआर टीमचा महत्वपूर्ण भाग असलेला श्रेयस अय्यर काल पाठीच्या दुखापतीमुळे आयपीएल 2023 मधून बाहेर पडला. सुरुवातीला तो केवळ आयपीएलच्या पहिल्या सत्रात अनुपस्थित असेल माहिती होती. परंतु आता त्याच्या पाठीवर लंडन येथे शस्त्रक्रिया होणार असल्याने पुढील तीन महिने तो मैदानात खेळताना दिसणार नाही. त्यामुळे यंदाच्या आयपीएलमध्ये केकेआरने श्रेयसची जागा घेणाऱ्या खेळाडूची घोषणा केली आहे.
यंदाच्या आयपीएलमध्ये श्रेयस अय्यर च्या जागी इंग्लंडचा फलंदाज जेसन रॉय याला कोलकाता संघामध्ये स्थान देण्यात आलं आहे. IPL 2023 साठी जेसन रॉयला त्याची बेस प्राईज 1.5 कोटी वरून 2.8 कोटींमध्ये करारबद्ध केले आहे. गुरुवारी केकेआर विरुद्ध आरसीबी यांच्यात होणाऱ्या सामन्यानंतर जेसन रॉय थेट अहमदाबाद येथे होणाऱ्या सामन्यात केकेआर संघाकडून खेळताना दिसेल.
जेसन रॉय याने आयपीएलमध्ये आतपर्यंत 13 सामने खेळले असून यात त्याने 329 धावा केल्या आहेत. आयपीएल 2017 आणि 2018 या सिजनमध्ये खेळलेला रॉय त्याचा शेवटचा आयपीएल सामना 2021 मध्ये सनरायझर्स हैदराबादकडून खेळला होता.