JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IPL 2023 : हॅरी ब्रुकच्या बॅटमधून निघालं आयपीएल 2023 मधील पाहिलं शतक

IPL 2023 : हॅरी ब्रुकच्या बॅटमधून निघालं आयपीएल 2023 मधील पाहिलं शतक

सनरायजर्स हैद्राबाद विरुद्ध केकेआर यांच्यात आयपीएलचा सामना खेळवला जात आहे. दरम्यान हैद्राबादचा स्टार फलंदाज हॅरी ब्रुकने आयपीएल 2023 मधील पाहिलं शतक आपल्या नावे केलं आहे.

जाहिरात

हॅरी ब्रुकच्या बॅटमधून निघालं आयपीएल 2023 मधील पाहिलं शतक

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 14 एप्रिल  : आयपीएल 2023 मध्ये आज 18 सामना सनरायजर्स हैद्राबाद विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात खेळवला जात आहे. या सामन्यात हैदराबादने कोलकाताला विजयासाठी 229 धावांच आव्हान दिल आहे. दरम्यान हैद्राबादचा स्टार फलंदाज हॅरी ब्रुकने आयपीएल 2023 मधील पाहिलं शतक आपल्या नावे केलं आहे. कोलकातामधील इडन गार्डनच्या मैदानावर सनरायजर्स हैद्राबाद विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात सामना सुरु आहे. या सामन्यात सुरुवातीला सनरायजर्स हैद्राबाद संघ फलंदाजीसाठी मैदानात उतरला. यावेळी विस्फोटक फलंदाज हॅरी ब्रुक सह मयांक अग्रवाल हे दोघे सुरुवातीपासूनच चांगली फटकेबाजी करीत होते. परंतु पाचव्या ओव्हरमध्ये मयांक अग्रवालची विकेट पडली. त्यानंतर लगेचच सहाव्या बॉलवर राहुल त्रिपाठी देखील 9 धावा करून माघारी परतला.

मात्र हॅरी ब्रुकने संघाचा डाव सावरत मैदानावर चौकार षटकारांची अतिशबाजी सुरु ठेवली. हॅरीने 55 चेंडूत 100 धावा केल्या यादरम्यान 12 चौकार आणि 3 षटकार लगावले. हॅरी ब्रुकने लगावलेले हे शतक आयपीएल 2023 मधील पहिले शतक ठरले. तसेच आयपीएल कारकिर्दीतील हॅरीचे हे पहिले शतक होते. हॅरी सोबतच कर्णधार एडन मार्करमने 50, अभिषेक शर्माने 32 तर हेनरिक क्लासेनने 16 धावा केल्या.  सनरायजर्स हैद्राबादने या सामन्यात 20 ओव्हरमध्ये 4 विकेट्स घालून 228 धावा केल्या.  तसेच कोलकाता समोर विजयासाठी 20 ओव्हरमध्ये 229 धावांचे आव्हान दिले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या