होमग्राऊंडवर दिल्लीसाठी गुड न्यूज, रिषभ पंतची एंट्री होणार, पण...
मुंबई, 4 एप्रिल : जगप्रसिद्ध इंडियन प्रीमियर लीग या स्पर्धेला सुरुवात झाली असून दररोज रोमांचक टी 20 सामने प्रेक्षकांना पाहायला मिळत आहेत. अशातच आज आयपीएलचा सातवा सामना दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध गुजरात जाएंट्स यांच्या होणार असून या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा माजी कर्णधार रिषभ पंतची एंट्री होणार आहे. दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर आज दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात सामना होणार आहे. दिल्ली संघाला त्यांच्या लखनऊ विरुद्ध झालेल्या पहिल्या सामन्यात पराभव पत्करावा लागला होता. तर गुजरात टायटन्स संघाने चेन्नई विरुद्ध त्यांच्या पहिल्या सामन्यात विजय मिळवला होता. होम ग्राउंडवर दिल्ली संघाचा आयपीएलमधील आज दुसरा सामना होणार असून यापूर्वी दिल्लीचा संघ आणि त्यांच्या चाहत्यांना गुड न्यूज मिळाली आहे. आयपीएल 2023 मधील दिल्लीच्या होम ग्राउंडवरचा पहिला सामना पाहण्यासाठी सध्या दुखापतग्रस्त असलेला माजी कर्णधार रिषभ पंत येणार आहे.
एनआयने याबाबत ट्विट करून ही माहिती दिली आहे. भारताचा युवा स्टार क्रिकेटर रिषभ पंतच्या कारला 30 डिसेंबर 2022 रोजी भीषण अपघात झाला होता. या अपघातात रिषभ पंत गंभीर जखमी झाला होता. यानंतर त्याच्या पायावर 2 शस्त्रक्रिया देखील पारपडलया. याअपघातानंतर रिषभ पंत प्रथमच क्रिकेटच्या मैदानावर पाऊल ठेवणार आहे. दिल्ली कॅपिटल्सने त्यांच्या पहिल्या सामन्यात रिषभची आठवण म्हणून त्याची जर्सी डगआउटमध्ये लावून ठेवली होती. दिल्ली संघाच्या या कृतीने तेव्हा सर्वांचे मन जिंकले होते.