JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IPL 2023 CSK vs RR : सूर्या पाठोपाठ राजस्थान रॉयल्सच्या कॅप्टनला लागलं 'ग्रहण', सलग दुसऱ्या मॅचमध्ये भोपळा

IPL 2023 CSK vs RR : सूर्या पाठोपाठ राजस्थान रॉयल्सच्या कॅप्टनला लागलं 'ग्रहण', सलग दुसऱ्या मॅचमध्ये भोपळा

चेन्नई सुपरकिंग्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना खेळवला जात आहे. परंतु या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनची सूर्यकुमार यादव सारखी गत झालेली पाहायला मिळाली आहे. यामुळे संजू सॅमसनला सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे.

जाहिरात

सूर्या पाठोपाठ राजस्थान रॉयल्सच्या कॅप्टनला लागलं 'ग्रहण', सलग दुसऱ्या मॅचमध्ये भोपळा

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 12 एप्रिल : आयपीएल 2023 मध्ये आज चेन्नई सुपरकिंग्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना खेळवला जात आहे. या सामन्यात धोनीने टॉस जिंकून राजस्थानला प्रथम फलंदाजीचे आव्हान दिले. परंतु या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनची सूर्यकुमार यादव सारखी गत झालेली पाहायला मिळाली आहे. यामुळे संजू सॅमसनला सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे. चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर चेन्नई सुपरकिंग्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स   यांच्यात सामना सुरु आहे. या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा संघ फलंदाजीसाठी प्रथम मैदानात उतरला. यावेळी चेन्नईच्या गोलंदाजांकडून होत असलेल्या भेदक माऱ्यासमोर राजस्थानच्या फलंदाजांची अवस्था खराब झाली. दुसऱ्याच ओव्हरमध्ये राजस्थानचा स्टार फलंदाज यशस्वी जयस्वाल याची विकेट पडकली. त्यानंतर पद्दीकल जॉस बटलर या दोघांनी संघाची बाजू सावरली आणि 77 धावांची भागीदारी रचली. परंतु नवव्या ओव्हरमध्ये पदिक्कल याची विकेट पडली. त्यानंतर मैदानात उतरलेल्या कर्णधार संजू सॅमसनकडून संघाला मोठी अपेक्षा होती. परंतु संजू या अपेक्षांवर खरा उतरला नाही.

मैदानातच उतरताच रवींद्र जडेजाने संजू सॅमसनची विकेट घेतली त्यामुळे संजूला भोपळा देखील फोडता आला नाही.  यासह संजू आयपीएल 2023 च्या सामन्यात सलग दुसऱ्यांदा  शुन्यावर बाद झाला. यापूर्वी दिल्ली कॅपिटल्सच्या सामन्यात देखील संजू शुन्य धावांवर बाद झाला होता. मंगळवारी मुंबई इंडियन्सचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवर गेल्या 6 डावात 4 वेळा शुन्यावर बाद होण्याची वेळ आली होती. तेव्हा सूर्याला त्याच्या फॉर्म वरून बरेच ट्रोल करण्यात आले.  याच प्रकारे संजू सॅमसनवरही सलग दुसऱ्या सामन्यात शुन्यावर बाद होण्याची वेळ आल्याने त्याची तुलना सूर्यकुमारशी केली जातेय.

संबंधित बातम्या

जाहिरात

सध्या संजू सॅमसनवर सोशल मीडियावर विविध मिम्स शेअर केले जात आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या