धोनी मैदानात येताच अनुष्का शर्माने दिली अशी रिअॅक्शन, वेधलं सर्वांचं लक्ष Video
मुंबई, 17 एप्रिल : आयपीएल 2023 मधील 24 वा सामना चेन्नई सुपरकिंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बँगलोर यांच्यात खेळवला जात आहे. यात चेन्नईने आरसीबीला विजयासाठी 226 धावांच आव्हान दिल. यासामन्या दरम्यान चेन्नईकडून एम एस धोनी फलंदाजीसाठी मैदानावर येताच विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्माने दिलेलया रिअॅक्शनने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. बंगळुरू येथील चिन्नस्वामी स्टेडियमवर चेन्नई सुपरकिंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बँगलोर यांच्यात सामना पारपडत आहे. यात आरसीबीचा कर्णधार फाफ डू प्लेसिसने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. यानंतर मैदानात फलंदाजीसाठी आलेल्या चेन्नईच्या संघाकडून डेवोन कॉनवेने 83, अजिंक्य रहाणे 37, शिवम दुबेने 52, अंबाती रायडूने 14, मोईन अलीने 19, रवींद्र जडेजाने 10 धावा केल्या. रवींद्र जडेजाची विकेट पडल्यावर एम एस धोनी शेवटचे दोन चेंडू खेळण्यासाठी मैदानात उतरला.
एम एस धोनी स्ट्राईकवर आल्यावर स्टेडियमवर चाहत्यांकडून मोठा जल्लोष करण्यात आला. हा जल्लोष पाहून स्टेडियमवर सामना पाहण्यासाठी आलेली विराट कोहली ची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्माने जवळ बसलेल्या मैत्रिणीला “दे लव्ह हिम” म्हणजे प्रेक्षक धोनीवर खूप प्रेम करतात असे म्हंटले. अनुष्काची ही रिअॅक्शन कॅमेऱ्यात कैद झाली आणि याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.