JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IPL 2023 MI vs CSK : मुंबईच्या होम ग्राउंडवर रोहित देणार का अर्जुन तेंडुलकरला प्लेईंग 11 मध्ये संधी?

IPL 2023 MI vs CSK : मुंबईच्या होम ग्राउंडवर रोहित देणार का अर्जुन तेंडुलकरला प्लेईंग 11 मध्ये संधी?

मुंबईचे होम ग्राउंड असलेल्या वानखेडे स्टेडियमवर चेन्नई सुपरकिंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात आज सामना रंगणार आहे. मुंबईचा घातक गोलंदाज आर्चर हा दुखापतग्रस्त असल्याने कर्णधार रोहित जुनिअर तेंडुलकरला प्लेईंग 11 मध्ये संधी देण्याची शक्यता आहे.

जाहिरात

मुंबईच्या होम ग्राउंडवर रोहित देणार का अर्जुन तेंडुलकरला प्लेईंग 11 मध्ये संधी?

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 8 एप्रिल : आयपीएल 2023 मध्ये चेन्नई सुपरकिंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात आज हायव्होल्टेज सामना रंगणार आहे. मुंबईचे होम ग्राउंड असलेल्या वानखेडे स्टेडियमवर हा सामना रंगणार असून याकरता मुंबई इंडियन्स सह धोनीच्या चेन्नई सुपरकिंग्सचे फॅन्स देखील उत्साहित आहेत.  मुंबईचा घातक गोलंदाज जोफ्रा आर्चर हा दुखापतग्रस्त असल्याने कर्णधार रोहित शर्मा जुनिअर तेंडुलकरला प्लेईंग 11 मध्ये संधी देण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शुक्रवारी नेट सेशनवेळी मुंबई इंडियन्स चा घातक गोलंदाज जोफ्रा आर्चरला चेंडू लागला आहे. त्यामुळे चेन्नई विरुद्ध आजच्या सामन्यात तो खेळण्याबाबत सांशकता वर्तवली जात आहे. जोफ्रा या सामन्यातून बाहेर पडल्यास मुंबई इंडियन्सला धक्का बसेल. परंतु याचवेळी मास्टरब्लास्टर  सचिन तेंडुलकर चा मुलगा अर्जुन तेंडुलकर आज चेन्नई विरुद्ध  आयपीएलमध्ये पदार्पण करण्याची शक्यता आहे. मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा जोफ्रा आर्चर दुखापतग्रस्त असल्याने आज प्लेईंग 11 मध्ये अर्जुन तेंडुलकरला संधी देऊ शकतो.

IPL 2023 MI vs CSK : वानखेडेवरील हायव्होल्टेज सामन्यापूर्वी CSK ला धक्का! महत्वाच्या खेळाडूला दुखापत मुंबई येथे झालेल्या पत्रकार परिषदेत काही दिवसांपूर्वी रोहित शर्मा आणि मुंबई इंडियन्सचे मुख्य प्रशिक्षक मार्क बाऊचर यांनी अर्जुन तेंडुलकरवर मुंबई संघाच्या व्यवस्थापनाची नजर असून त्याला यावर्षी प्लेईंग 11 मध्ये संधी मिळू शकते, असे सांगितले होते. २०२१ मध्ये अर्जुन तेंडुलकरला मुंबई इंडियन्सने आपल्या संघात घेतले होते. परंतु दोन वर्ष अर्जुन तेंडुलकरला मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग 11 मध्ये संधी देण्यात आली नाही. त्यामुळे यावर्षी तरी अर्जुन तेंडुलकरला आयपीएलमध्ये पदार्पणाची संधी मिळणार का? हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या