CSK vs LSG सामना सुरू होण्याआधी स्टेडियमवर घडली विचित्र घटना, ज्यामुळे मॅचवर झाला इम्पॅक्ट
मुंबई, 3 एप्रिल : आयपीएल 2023 ला सुरुवात झाली असून यामध्ये प्रेक्षकांना दररोज रोमांचक सामने पाहायला मिळत आहेत. आज आयपीएल च्या 16 व्या सीजनचा सहावा सामना चेन्नई सुपरकिंग्स विरुद्ध लखनऊ सुपर जाएंट्स यांच्यात सुरु असून या सामन्यापूर्वी स्टेडियमवर एक विचित्र घटना घडली. ज्यामुळे बहुप्रतीक्षित सामना सुरु होण्यासाठी विलंब झाला. चेन्नई येथील चेपॉक स्टेडियमवर चेन्नई विरुद्ध लखनऊ यांच्यात सामना सुरु असून तब्बल 4 वर्षांनी चेन्नईचा संघ आपल्या होम ग्राउंडवर खेळत आहे. सामन्याच्या सुरुवातीला दोन्ही संघांमध्ये नाणेफेक झाली. यावेळी लखनऊ सुपर जाएंट्सचा कर्णधार के एल राहुलने टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. यानंतर के एल राहुल मैदानावर फिल्डिंग लावत असताना चेपॉक स्टेडियमवर अचानकपाने एका कुत्र्याची एंट्री झाली.
कुत्रा मैदानात शिरताच मैदानावरील स्टेडियमवरील स्टाफ त्याला मैदानाबाहेर घालवण्यासाठी प्रयत्न करत होता. परंतु यावेळी कुत्र्याने त्यांची चांगलीच दमछाक उडवली. अखेर कुत्र्याला मैदानाबाहेर घालवण्यात यश आले. परंतु या घटनेमुळे मॅच सुरु व्हायला खूप उशीर झाला. सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून नेटकरी यावर विविध प्रतिक्रिया व्यक्त करीत आहेत.