JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IPL 2023 CSK vs KKR : जेसन रॉय आणि रिंकू सिंहची खेळी व्यर्थ, चेन्नई सुपरकिंग्सची विजयी हॅट्रिक

IPL 2023 CSK vs KKR : जेसन रॉय आणि रिंकू सिंहची खेळी व्यर्थ, चेन्नई सुपरकिंग्सची विजयी हॅट्रिक

आयपीएल 2023 मध्ये रविवारी चेन्नई सुपरकिंग्स विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात सामना खेळवण्यात आला. या सामन्यात चेन्नईने केकेआरचा पराभव केला आहे.

जाहिरात

जेसन रॉय आणि रिंकू सिंहची खेळी व्यर्थ, चेन्नई सुपरकिंग्सची विजयी हॅट्रिक

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई , 23 एप्रिल : आयपीएल 2023 मध्ये रविवारी चेन्नई सुपरकिंग्स विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात सामना खेळवण्यात आला. या सामन्यात चेन्नईने केकेआरचा पराभव केला आहे. चेन्नई सुपरकिंग्सने हा सामना तब्बल 49 धावांनी जिंकला असून हा चेन्नईचा सलग तिसरा विजय ठरला. कोलकाता येथील ईडन गार्डन स्टेडियमवर चेन्नई सुपरकिंग्स विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात सामना पारपडला. या सामन्यात सुरुवातीला चेन्नई सुपरकिंग्सने फलंदाजी करताना कोलकाता समोर विजयासाठी 236 धावांचे आव्हान दिले. या दरम्यान चेन्नईकडून अजिंक्य रहाणेने 71, ऋतुराज गायकवाडने 35, कॉनवेने 56 , शिवम दुबेने 50, रवींद्र जडेजाने 18 तर कॅप्टन कूल एम एस धोनीने 2 धावांची कामगिरी केली. चेन्नईने 20 ओव्हरमध्ये 4 विकेट्स घालवून तब्बल 235 धावा केलया. चेन्नईने कोलकाता विरुद्ध केलेली ही धाव संख्या यंदाच्या आयपीएलमधील सर्वाधिक धाव संख्या होती.

विजयासाठी कोलकाताला 236 धावांचे आव्हान दिल्यावर त्यांच्या खेळाडूंकडून जबरदस्त कामगिरी होणे आवश्यक होते. परंतु कोलकाता नाइट रायडर्सच्या फलंदाजीची सुरुवात खराब झाली. कोलकाताकडून व्यंकटेश अय्यरने 20, नितीश राणा 27, जेसन रॉयने 61, रिंकू सिंहने 53 धावांची कामगिरी केली. तर इतर कोणत्याही फलंदाजाला दोन अंकी धाव संख्या देखील करता आली नाही. अखेर 49 धावांनी चेन्नई सुपरकिंग्सचा विजय झाला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या