JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IPL 2022 : उमरान मलिकने इतिहास घडवला, शेवटच्या ओव्हरमध्ये पहिल्यांदाच झाला असा पराक्रम

IPL 2022 : उमरान मलिकने इतिहास घडवला, शेवटच्या ओव्हरमध्ये पहिल्यांदाच झाला असा पराक्रम

आयपीएल 2022 मध्ये (IPL 2022) सनरायजर्स हैदराबाद आणि पंजाब किंग्स (Sunrisers Hyderabad vs Punjab Kings) यांच्यात झालेल्या सामन्यात मोठ्या विक्रमाची नोंद झाली आहे. हैदराबादचा फास्ट बॉलर उमरान मलिक (Umran Malik) याने हा पराक्रम केला आहे.

जाहिरात

Photo-IPL/BCCI

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी मुंबई, 17 एप्रिल : आयपीएल 2022 मध्ये (IPL 2022) सनरायजर्स हैदराबाद आणि पंजाब किंग्स (Sunrisers Hyderabad vs Punjab Kings) यांच्यात झालेल्या सामन्यात मोठ्या विक्रमाची नोंद झाली आहे. हैदराबादचा फास्ट बॉलर उमरान मलिक (Umran Malik) याने 20व्या म्हणजेच शेवटच्या ओव्हरमध्ये एकही रन दिली नाही, या ओव्हरमध्ये पंजाबने 4 विकेट गमावल्या, यातल्या 3 विकेट उमरान मलिकला मिळाल्या. 20 व्या ओव्हरच्या दुसऱ्या बॉलला उमरानने स्वत:च्याच बॉलिंगवर ओडियन स्मिथचा कॅच घेतला, यानंतर चौथ्या बॉलला राहुल चहर आणि पाचव्या बॉलला वैभव अरोरा बोल्ड झाले, तर शेवटच्या बॉलवर अर्शदीप सिंग रन आऊट झाला. ओव्हरच्या पहिल्या आणि तिसऱ्या बॉलला पंजाबला एकही रन करता आली नाही. उमरान मलिकने 4 ओव्हरमध्ये 28 रन देत 4 विकेट घेतल्या. आयपीएलमध्ये आतापर्यंत 3 वेळा इनिंगची 20वी ओव्हर मेडन म्हणजेच एकही रन न आलेली गेली आहे, पण पहिल्या इनिंगमध्ये मेडन ओव्हर टाकणारा उमरान मलिक हा आयपीएल इतिहासातला पहिलाच खेळाडू आहे. याआधी इरफान पठाणने पंजाबकडून खेळताना 2008 साली मुंबईविरुद्ध आणि 2017 साली पुण्याकडून खेळताना जयदेव उनाडकटने हैदराबादविरुद्ध 20 वी ओव्हर मेडन टाकली होती. पठाण आणि जयदेवची ही कामगिरी मॅचच्या दुसऱ्या इनिंगमधली होती. उमरान मलिकच्या या भेदक बॉलिंगमुळे पंजाबचा 20 ओव्हरमध्ये 151 रनवर ऑल आऊट झाला. मलिकच्या 4 विकेटशिवाय भुवनेश्वर कुमारला 3 आणि टी नटराजन, सुचित यांना प्रत्येकी 1-1 विकेट मिळाली. पंजाबकडून लियाम लिव्हिंगस्टोनने 33 बॉलमध्ये 60 रन केले, यात 5 फोर आणि 4 सिक्सचा समावेश होता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या