JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IPL Schedule 2022 : CSK vs KKR सामन्याने आयपीएलला सुरूवात, असं आहे संपूर्ण वेळापत्रक

IPL Schedule 2022 : CSK vs KKR सामन्याने आयपीएलला सुरूवात, असं आहे संपूर्ण वेळापत्रक

आयपीएल 2022 च्या वेळापत्रकाची (IPL 2022 Schedule) घोषणा बीसीसीआयने (BCCI) केली आहे. 26 मार्चपासून आयपीएलला सुरूवात होणार आहे, तर फायनल 29 मे रोजी खेळवली जाणार आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

ई, 6 मार्च : आयपीएल 2022 च्या वेळापत्रकाची (IPL 2022 Schedule) घोषणा बीसीसीआयने (BCCI) केली आहे. 26 मार्चपासून आयपीएलला सुरूवात होणार आहे, तर फायनल 29 मे रोजी खेळवली जाणार आहे. आयपीएलच्या यंदाच्या मोसमाचा पहिला सामना गतविजेती चेन्नई सुपर किंग्स आणि उपविजेत्या कोलकाता नाईट रायडर्स (CSK vs KKR) यांच्यात होणार आहे. यंदाच्या वर्षी टीमची संख्याही वाढून 8 वरून 10 झाली आहे. लखनऊ आणि अहमदाबाद या दोन टीम आयपीएलमध्ये नव्याने दाखल झाल्या आहेत, त्यामुळे टीमचा फॉरमॅटही बदलला आहे. कोरोना व्हायरस आणि कठोर बायो-बबलच्या नियमामुळे विमान प्रवास टाळण्यासाठी यावर्षी ग्रुप स्टेजच्या 70 मॅच मुंबईतील वानखेडे, ब्रेबॉर्न, नवी मुंबईतील डीवाय पाटील आणि पुण्याच्या गहुंजे स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहेत.

आयपीएलमध्ये यंदा 10 टीमना 5-5 च्या ग्रुपमध्ये विभागण्यात आलं आहे. ग्रुप ए मध्ये मुंबई इंडियन्स, कोलकाता नाईट रायडर्स, राजस्थान रॉयल्स, दिल्ली कॅपिटल्स आणि लखनऊ सुपर जाएंट्स या टीम आहेत, तर ग्रुप बी मध्ये चेन्नई सुपर किंग्स, सनरायजर्स हैदराबाद, रॉयल चॅलेंजर्स बँगलोर, पंजाब किंग्स आणि गुजरात जाएंट्स यांचा समावेश आहे. बीसीसीआयने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार पहिला डबल हेडर म्हणजेच एकाच दिवशी दोन सामने 27 मार्चला होणार आहेत. दोन टीम वाढल्याने आयपीएलच्या मॅचही वाढल्यात, त्यामुळे यंदा डबल हेडरची संख्याही जास्त आहे. आयपीएल सामन्यांसाठी 25 टक्के प्रेक्षकांना स्टेडियममध्ये यायची परवानगी महाराष्ट्र सरकारने दिली आहे. प्ले-ऑफचे सामने कुठे खेळवले जातील, याबाबत मात्र अजून कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही, पण हे चारही सामने गुजरातच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होतील, असा अंदाज आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या