JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IPL 2022 : बॅट तोडली, स्टेडियममधून पळाला, 4 तास मरीन ड्राईव्हवर बसला आणि बदललं संजूचं आयुष्य

IPL 2022 : बॅट तोडली, स्टेडियममधून पळाला, 4 तास मरीन ड्राईव्हवर बसला आणि बदललं संजूचं आयुष्य

आयपीएल 2022 मध्ये (IPL 2022) राजस्थान रॉयल्सचा (Rajasthan Royals) कर्णधार असलेला संजू सॅमसन (Sanju Samson) आजही टीम इंडियात जागा मिळवण्यासाठी संघर्ष करत आहे, पण त्याची गणना भारतातल्या टॅलेंटेड विकेट कीपर बॅटरमध्ये होते.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 3 मे : आयपीएल 2022 मध्ये (IPL 2022) राजस्थान रॉयल्सचा (Rajasthan Royals) कर्णधार असलेला संजू सॅमसन (Sanju Samson) आजही टीम इंडियात जागा मिळवण्यासाठी संघर्ष करत आहे, पण त्याची गणना भारतातल्या टॅलेंटेड विकेट कीपर बॅटरमध्ये होते. 21व्या वर्षीच संजू सॅमसनने भारतासाठी पदार्पण केलं, 2015 साली झिम्बाब्वे दौऱ्यात त्याला टीम इंडियामध्ये स्थान मिळालं होतं, पण या संधीचा फायदा त्याला घेता आला नाही. या दरम्यान त्याला त्याची स्थानिक टीम केरळमधूनही बाहेर करण्यात आलं. संजू सॅमसनने क्रिकेट सोडण्याचाही निर्णय घेतला, पण त्याने स्वत:ला सांभाळलं आणि 25व्या वर्षी पुन्हा टीम इंडियात पुनरागमन केलं. या 5 वर्षांमध्ये संजूला बऱ्याच त्रासाचा सामना करावा लागला. ब्रेकफास्ट विथ चॅम्पियन या कार्यक्रमात संजूने त्याच्या संघर्षाबाबत खुलासा केला. ‘मी 20-21 वर्षांचा असतानाच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. 25 वर्षांचा झाल्यानंतर मला पुन्हा एकदा टीम इंडियाकडून खेळण्याची संधी मिळाली. ती 5 वर्ष माझ्यासाठी आव्हानात्मक होती, कारण मला केरळच्या टीममधूनही काढून टाकण्यात आलं होतं. यानंतर मला स्वत:च्या क्षमतेवरच संशय यायला लागला होता. आपलं पुनरागमन होईल का, असा विचारही माझ्या मनात आला होता,’ असं संजू म्हणाला. क्रिकेट सोडण्याचा विचार ‘या 5 वर्षांमध्ये आयपीएलमध्येही रन येत नव्हत्या, मी लगेच आऊट व्हायचो. अशाच एका सामन्यात लवकर आऊट झाल्यानंतर मी ड्रेसिंग रूममध्ये आलो आणि बॅट जोरात खाली फेकली, मॅच सुरू असतानाच मी स्टेडियम सोडून निघून गेलो. बहुतेक ब्रेबॉर्न स्टेडियम होतं. क्रिकेट सोडून केरळला घरी जाण्याचा विचार माझ्या मनात येत होता,’ असं संजूने सांगितलं. ‘यानंतर मी मरीन ड्राईव्हवर गेलो आणि समुद्राकडे बघत बसलो. माझ्यासोबत हे काय होत आहे, याचाच विचार माझ्या डोक्यात होता. समुद्र किनाऱ्यावर मी 4 तास बसलो आणि मॅच संपल्यानंतर रात्री हॉटेलमध्ये गेलो. लगेचच मी बॅट बघितली जी जमिनीवर फेकली होती. ती बॅट तुटलेली होती, मला खूप वाईट वाटलं. बॅट उशीवर फेकायला पाहिजे होती, असं मला तेव्हा वाटलं, कारण ती माझी सगळ्यात आवडती बॅट होती,’ असं वक्तव्य संजूने केलं. आयपीएल 2022 मध्ये 2 अर्धशतकं आयपीएल 2022 मध्ये संजूची कामगिरी फारशी समाधानकारक झाली नाही. 10 मॅचमध्ये 33 च्या सरासरीने त्याने 298 रन केले, यात 2 अर्धशतकांचा समावेश आहे. संजूने या मोसमात 22 फोर आणि 21 सिक्स मारल्या आहेत. संजूच्या कॅप्टन्सीमध्ये मात्र राजस्थानची कामगिरी चांगली झाली आहे. 10 पैकी 6 मॅच जिंकत राजस्थान तिसऱ्या क्रमांकावर आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या