JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IPL 2022 : चुकीला माफी नाही! राजस्थानला 88 रनची शिक्षा, मॅचही गमावली

IPL 2022 : चुकीला माफी नाही! राजस्थानला 88 रनची शिक्षा, मॅचही गमावली

क्रिकेटच्या मैदानात एक चूक किती महागात पडू शकते, याचा प्रत्यय आयपीएल 2022 मध्ये (IPL 2022) राजस्थानला दिल्लीविरुद्धच्या (Rajasthan Royals vs Delhi Capitals) मॅचमध्ये आला.

जाहिरात

Photo-IPL

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी मुंबई, 11 मे : क्रिकेटच्या मैदानात एक चूक किती महागात पडू शकते, याचा प्रत्यय आयपीएल 2022 मध्ये (IPL 2022) राजस्थानला दिल्लीविरुद्धच्या (Rajasthan Royals vs Delhi Capitals) मॅचमध्ये आला. राजस्थानने दिलेल्या 161 रनच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या दिल्लीची सुरूवात अत्यंत खराब झाली होती. श्रीकर भरत इनिंगच्या दुसऱ्याच बॉलला शून्य रनवर आऊट झाला होता, यानंतर दिल्लीचा स्कोअर 2 रन असताना मिचेल मार्शही पॅव्हेलियनमध्ये गेला असता, पण राजस्थानने मोठी चूक केली आणि त्यांना ही मॅच गमवावी लागली. राजस्थानने ही चूक केली तेव्हा मार्श 1 रनवर खेळत होता, पण पुढे त्याने 88 रन केले. मार्शने 62 बॉलमध्ये 89 रन केले, यात 5 फोर आणि 7 सिक्सचा समावेश होता. याशिवाय वॉर्नरने 41 बॉलमध्ये नाबाद 52 रनची खेळी केली. मिचेल मार्श (Mitchell Marsh) आणि डेव्हिड वॉर्नर (David Warner) यांच्यात 144 रनची पार्टनरशीप झाली. काय झाली चूक? तिसऱ्या ओव्हरचा तिसरा बॉल ट्रेन्ट बोल्टने यॉर्कर टाकला. हा बॉल मार्शच्या बुटांना जाऊन लागला. यानंतर बोल्टने थोडं अपील केलं, पण त्याला राजस्थानच्या खेळाडूंनी साथ दिली नाही, त्यामुळे राजस्थानने डीआरएसही घेतला नाही, पण नंतर रिप्लेमध्ये जे दिसलं ते पाहून राजस्थानची टीम हैराण झाली.

संबंधित बातम्या

बोल्टने टाकलेला यॉर्कर बॉल पहिले मार्शच्या बॅटला लागून मग बुटांना लागला, असं राजस्थानच्या टीमला वाटत होतं, पण रिप्लेमध्ये मात्र बॉल पहिले बुटांना आणि मग बॅटला लागल्याचं दिसत होतं. तसंच बॉल स्टम्पवर जाऊन आदळत असल्याचंही रिप्लेमध्ये स्पष्ट झालं, त्यामुळे राजस्थानने जर डीआरएस घेतला असता, तर मार्श एलबीडब्ल्यू झाला असता. ही घटना घडली तेव्हा मार्श 8 बॉलमध्ये 1 रनवर खेळत होता. त्या क्षणी मार्शची विकेट मिळाली असती तर मॅचचा निकाल कदाचित वेगळा लागला असता, पण या विजयामुळे दिल्लीचं प्ले-ऑफचं आव्हान अजूनही कायम आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या