JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IPL 2022 : अखेरच्या सामन्यात पंजाबच 'किंग', हैदराबादचा शेवटही लाजिरवाणा

IPL 2022 : अखेरच्या सामन्यात पंजाबच 'किंग', हैदराबादचा शेवटही लाजिरवाणा

आयपीएल 2022 च्या (IPL 2022) लीग स्टेजच्या अखेरच्या सामन्यात पंजाब किंग्सने सनरायजर्स हैदराबादचा (Punjab Kings vs SRH) 5 विकेटने पराभव केला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 22 मे : आयपीएल 2022 च्या (IPL 2022) लीग स्टेजच्या अखेरच्या सामन्यात पंजाब किंग्सने सनरायजर्स हैदराबादचा (Punjab Kings vs SRH) 5 विकेटने पराभव केला आहे. हैदराबादने दिलेलं 158 रनचं आव्हान पंजाबने 15.1 ओव्हरमध्ये 5 विकेट गमावून पार केलं. लियाम लिव्हिंगस्टोनने (Liam Livingstone) 22 बॉलमध्ये नाबाद 49 रन केले, यात 5 सिक्स आणि 2 फोरचा समावेश होता. याशिवाय शिखर धवनने (Shikhar Dhawan) 39 आणि बेयरस्टोने 23 रनची खेळी केली. हैदराबादकडून फजलहक फारुकीला सर्वाधिक 2 विकेट मिळाल्या, याशिवाय वॉशिंग्टन सुंदर, जगदीशा सुचित आणि उमरान मलिक यांना 1-1 विकेट घेण्यात यश आलं. या सामन्यात सनरायजर्स हैदराबादचा कर्णधार भुवनेश्वर कुमारने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला. केन विलियमसन हा पत्नी बाळाला जन्म देणार असल्यामुळे न्यूझीलंडला रवाना झाला, म्हणून भुवनेश्वर कुमारला शेवटच्या सामन्यासाठी हैदराबादचं कर्णधार करण्यात आलं होतं. पहिले बॅटिंगला आल्यानंतर हैदराबादने 20 ओव्हरमध्ये 8 विकेट गमावून 157 रन केले. हैदराबादकडून अभिषेक शर्माने सर्वाधिक 43 रन केले, याशिवाय रोमारियो शेफर्डने नाबाद 26 आणि वॉशिंग्टन सुंदरने 25 रन केले. पंजाबकडून हरप्रीत ब्रार आणि नॅथन एलिस यांना 3-3 विकेट मिळाल्या, तर रबाडाला 1 विकेट घेण्यात यश आलं. आयपीएलच्या लीग स्टेजचा हा अखेरचा सामना होता. या विजयासह पंजाब किंग्सने मोसमाचा शेवट सहाव्या क्रमांकावर आणि हैदराबादने आठव्या क्रमांकावर केला. पंजाबने 14 पैकी 7 मॅच जिंकल्या आणि 7 मॅचमध्ये त्यांचा पराभव झाला तर हैदराबादने 14 पैकी 6 मॅचमध्ये विजय मिळवला आणि 8 मॅचमध्ये त्यांना पराभूत व्हावं लागलं. आयपीएल प्ले-ऑफच्या टीम आधीच ठरल्यामुळे या सामन्याला फारसं महत्त्व नव्हतं. गुजरात टायटन्स, राजस्थान रॉयल्स, लखनऊ सुपर जाएंट्स आणि आरसीबी या चार टीम प्ले-ऑफमध्ये खेळणार आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या