JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IPL 2022 : पोस्टमास्तरचा प्रताप, 24 कुटुंबांच्या FD ने आयपीएल बेटिंग, एक कोटींना चुना

IPL 2022 : पोस्टमास्तरचा प्रताप, 24 कुटुंबांच्या FD ने आयपीएल बेटिंग, एक कोटींना चुना

पोस्टात गुंतवणूक केलेल्या 24 कुटुंबांचे 1 कोटी रुपये आयपीएलमध्ये सट्टा (IPL Betting) लावण्यासाठी वापरण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी मध्य प्रदेशमधल्या पोस्टमास्तरला (Post Master) अटक करण्यात आली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 25 मे : पोस्टात गुंतवणूक केलेल्या 24 कुटुंबांचे 1 कोटी रुपये आयपीएलमध्ये सट्टा (IPL Betting) लावण्यासाठी वापरण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी मध्य प्रदेशमधल्या पोस्टमास्तरला (Post Master) अटक करण्यात आली आहे. विशाल अहिरवार, असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव असून तो मध्य प्रदेशच्या सागर जिल्ह्यातील बिनाच्या सब पोस्ट ऑफिसचा पोस्टमास्तर आहे. काही गुंतवणूकदारांनी तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी शुक्रवारी विशाल अहिरवारला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अहिरवारने गुंतवणूकदारांनी पोस्टात एफडीसाठी दिलेले पैसे आयपीएलमध्ये सट्टा लावण्यासाठी वापरले गेले. गुंतवणूकदारांचे हे पैसे त्यांच्या खात्यात जमाच करण्यात आले नाहीत. मागच्या दोन वर्षांपासून हा पोस्टमास्तर गुंतवणूकदारांची फसवणूक करत असल्याचंही तपासात समोर आलं आहे. अहिरवार गुंतवणूकदारांना फिक्स डिपॉझिटची पासबूक देत होता. या पासबूकमध्ये गुंतवणूकदारांनी गुंतवलेली रक्कम लिहिली होती, पण पोस्ट ऑफिसच्या रेकॉर्डमध्ये हे पैसे आलेच नाहीत. अहिरवारने हे पैसे त्याच्या खिशात टाकले. काही गुंतवणूकदार त्यांचे पैसे काढण्यासाठी जेव्हा पोस्टात गेले, तेव्हा पोस्ट ऑफिसमध्ये अशी कोणती गुंतवणूक झाली असल्याचं रेकॉर्डच नसल्याचं त्यांना सांगण्यात आलं. यानंतर अहिरवारने केलेली फसवणूक समोर आली, यानंतर बिना गव्हर्नमेंट रेल्वे पोलिसांनी शुक्रवारी अहिरवारला अटक केली. अहिरवार याच्यावर आधीही आर्थिक अफरातफरी केल्याचे आरोप झाले होते. मागच्या दोन वर्षांमध्ये आपण आयपीएल बेटिंगसाठी 2 कोटी रुपये वापरल्याचं त्याने तपासात कबूल केल्याची माहितीही पोलिसांनी दिली आहे. याआधी अहिरवार खिमलसाच्या सब पोस्ट ऑफिसमध्येही कार्यरत होता, तिकडेही आर्थिक अनियमिततेप्रकरणी त्याचं निलंबन करण्यात आलं होतं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या