Photo-Mumbai Indians/Twitter
मुंबई, 3 एप्रिल : आयपीएल 2022 च्या (IPL 2022) प्ले-ऑफची (IPL Play Off) रेस आता आणखी रोमांचक झाली आहे. प्रत्येक टीमच्या 9-10 मॅच झाल्या आहेत, त्यामुळे आता हळू हळू प्ले-ऑफचं चित्र स्पष्ट व्हायला लागलं आहे. प्ले-ऑफच्या शर्यतीमध्ये आता मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) सोडली तर इतर सगळ्या 9 टीम आहेत, त्यामुळे आता मुंबईकडे इतर टीमच्या स्वप्नांना धक्का देण्याची संधी आहे. आयपीएल पॉईंट्स टेबलमध्ये (IPL Points Table) गुजरात टायटन्स (Gujarat Titans) 16 पॉईंट्ससह पहिल्या क्रमांकावर, लखनऊ 14 पॉईंट्ससह दुसऱ्या, राजस्थान 12 पॉईंट्ससह तिसऱ्या क्रमांकावर आहे. तर हैदराबाद, पंजाब आणि आरसीबी प्रत्येकी 10-10 पॉईंट्ससह चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या क्रमांकावर आहे. दिल्ली आणि केकेआर प्रत्येकी 8-8 पॉईंट्ससह सातव्या आणि आठव्या, चेन्नई सुपर किंग्स 6 पॉईंट्ससह नवव्या आणि मुंबई इंडियन्स 2 पॉईंट्ससह दहाव्या क्रमांकावर आहे. पॉईंट्स टेबलवर नजर टाकली तर केकेआर (KKR) आणि सीएसकेला (CSK) अजूनही प्ले-ऑफमध्ये पोहोचण्याची संधी आहे. या दोन्ही टीम पुढचे सामने जिंकल्या तर आरसीबी (RCB) आणि दिल्लीच्या टीमचा (Delhi Capitals) खेळ खल्लास होऊ शकतो. मुंबईचे उरलेले सामने आता गुजरात, केकेआर, सीएसके, हैदराबाद आणि दिल्ली यांच्याविरुद्ध आहेत, त्यामुळे मुंबईच्या टीमकडे गुजरात वगळता इतर सगळ्या टीमचा प्ले-ऑफचा खेळ खराब करण्याची संधी आहे.