JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IPL 2022 : संघर्ष करणाऱ्या Ishan Kishan ला आठवला युनिव्हर्स बॉस, Gayle सोबत केली स्वत:ची तुलना

IPL 2022 : संघर्ष करणाऱ्या Ishan Kishan ला आठवला युनिव्हर्स बॉस, Gayle सोबत केली स्वत:ची तुलना

आयपीएल 2022 च्या (IPL 2022) लिलावात सगळ्यात महागडा खेळाडू ठरलेल्या इशान किशनला (Ishan Kishan) अपेक्षेप्रमाणे खेळता आलं नाही. तरीही मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) या विकेट कीपरला त्याच्या बॅटिंग फॉर्मची चिंता नाही.

जाहिरात

Ishan Kishan

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 18 मे : आयपीएल 2022 च्या (IPL 2022) लिलावात सगळ्यात महागडा खेळाडू ठरलेल्या इशान किशनला (Ishan Kishan) अपेक्षेप्रमाणे खेळता आलं नाही. तरीही मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) या विकेट कीपरला त्याच्या बॅटिंग फॉर्मची चिंता नाही. मोठ्या खेळाडूलाही कधी ना कधी खराब काळातून जावं लागतं, असं इशान म्हणाला. मुंबईने इशानला 15 कोटी 25 लाख रुपयांना विकत घेतलं, पण 13 सामन्यांमध्ये त्याने 30.83 च्या सरासरीने 370 रन केले. आयपीएलच्या या मोसमात मुंबईने पहिल्या आठही मॅच गमावल्या होत्या, त्यामुळे त्यांचं प्ले-ऑफचं आव्हान आधीच संपुष्टात आलं होतं. सनरायजर्स हैदराबादविरुद्ध 3 रननी झालेल्या पराभवानंतर इशान किशन बोलत होता. ‘मोठ्या खेळाडूंनाही फॉर्मसाठी झगडावं लागतं. मी क्रिस गेललाही (Chris Gayle) वेळ घेताना पाहिलं आहे. प्रत्येक दिवस नवा असतो आणि प्रत्येक मॅच नवीन असते. अनेकवेळा चांगली सुरूवात मिळते आणि काही वेळा विरोधी बॉलर तयारी करून मैदानात उतरतो. बाहेर लोकांना जे हवं असतं आणि ड्रेसिंग रूममधली रणनिती यात फरक असतो,’ असं वक्तव्य इशानने केलं. ‘तुम्ही पहिल्या बॉलपासूनच धुलाई सुरू कराल आणि तुमची भूमिका एकच असेल, हे क्रिकेटमध्ये शक्य नसतं. टीमबाबत विचार केला तर तुमची भूमिका स्पष्ट असणं गरजेचं आहे,’ असंही इशान म्हणाला. मुंबई इंडियन्स आयपीएल प्ले-ऑफच्या रेसमधून बाहेर झाली असली तरी बऱ्याच टीमचं भवितव्य मुंबईवर अवलंबून आहे. मंगळवारी झालेल्या सामन्यात हैदराबादचा विजय झाला असला तरी टीम डेव्हिडच्या खेळीमुळे त्यांच्या प्ले-ऑफच्या स्वप्नांना धक्का लागला. नेट रनरेट सुधारण्यासाठी हैदराबादला हा सामना मोठ्या फरकाने जिंकणं गरजेचं होतं. हैदराबादचे प्रशिक्षक टॉम मुडी यांनीही हे मान्य केलं. ‘टीम डेव्हिडने आक्रमक खेळी केली नसती तर हैदराबादची प्ले-ऑफला पोहोचण्याची शक्यता वाढली असती. आमची प्राथमिकता मॅच जिंकणं होती. आम्ही चांगल्या रन केल्या, पण टीम डेव्हिडने आक्रमक खेळी केली नसती तर आमचा नेट रनरेट चांगला झाला असता,’ असं मुडी म्हणाले. हैदराबाद सध्या 12 पॉईंट्ससह आठव्या क्रमांकावर आहे. केकेआर आणि पंजाब यांचेही तेवढेच पॉईंट्स आहेत, पण त्यांचा नेट रनरेट हैदराबादपेक्षा चांगला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या