मुंबई, 17 मे : आयपीएल 2022 च्या (IPL 2022) प्ले-ऑफसाठीची रेस (IPL Play Off) आता आणखी थरारक झाली आहे. करो या मरो लढतीसाठी सनरायजर्स हैदराबादची (SRH vs MI) टीम मैदानात उतरत आहे. हैदराबादसमोर आव्हान आहे ते मुंबई इंडियन्सचं. या सामन्यात मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला आहे. या सामन्यात मुंबईने टीममध्ये दोन बदल केले आहेत. मयंक मार्कंडे आणि संजय यादव यांना संधी देण्यात आली आहे, तर कुमार कार्तिकेय आणि ऋतीक शौकीन यांना बाहेर करण्यात आलं आहे. सनरायजर्स हैदराबादनेही टीममध्ये दोन बदल केले आहेत. शशांकऐवजी प्रियम गर्ग आणि मार्को जेनसनऐवजी फजल हक फारुकी यांना खेळवण्याचा निर्णय विलियमसनने घेतला आहे. LIVE Score पाहण्यासाठी क्लिक करा प्ले-ऑफच्या रेसमध्ये कायम राहण्यासाठी हैदराबादला हा सामना जिंकणं गरजेचं आहे, तर दुसरीकडे मुंबईची टीम आधीच प्ले-ऑफच्या शर्यतीतून बाहेर झाली आहे. हैदराबादने या मोसमात 12 मॅचपैकी 5 मॅच जिंकल्या असून 7 सामन्यांमध्ये त्यांचा पराभव झाला आहे. हैदराबादची टीम अभिषेक शर्मा, प्रियम गर्ग, केन विलियमसन, राहुल त्रिपाठी, एडन मार्करम, निकोलस पूरन, वॉशिंग्टन सुंदर, भुवनेश्वर कुमार, फजलहक फारुकी, उमरान मलिक, टी नटराजन मुंबईची टीम इशान किशन, रोहित शर्मा, डॅनियल सॅम्स, तिलक वर्मा, रमणदीप सिंग, ट्रिस्टन स्टब्स, टीम डेव्हिड, संजय यादव, जसप्रीत बुमराह, रिले मेरेडिथ, मयंक मार्कंडे