JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IPL 2022 फायनलआधी भडकली Sanju Samson ची पत्नी, नवऱ्याच्या अपमानानंतर प्रसारणकर्त्यांवर साधला निशाणा

IPL 2022 फायनलआधी भडकली Sanju Samson ची पत्नी, नवऱ्याच्या अपमानानंतर प्रसारणकर्त्यांवर साधला निशाणा

आयपीएल 2022 ची फायनल (IPL 2022 Final) गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स (Gujarat Titans vs Rajasthan Royals) यांच्यात होणार आहे. या मॅचआधीच राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसन (Sanju Samson Wife) याची पत्नी चारुलताने आयपीएलचे अधिकृत प्रसारणकर्ते स्टार स्पोर्ट्सवर निशाणा साधला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

अहमदाबाद, 29 मे : आयपीएल 2022 ची फायनल (IPL 2022 Final) गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स (Gujarat Titans vs Rajasthan Royals) यांच्यात होणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना रंगणार आहे, पण या मॅचआधीच राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसन (Sanju Samson Wife) याची पत्नी चारुलताने आयपीएलचे अधिकृत प्रसारणकर्ते स्टार स्पोर्ट्सवर निशाणा साधला आहे. आयपीएलच्या सुरूवातीला स्टार स्पोर्ट्सने दावेदार टीमचं एक कार्टून प्रसारित केलं होतं, यामध्ये सीएसकेचा कर्णधार एमएस धोनी आणि मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा यांना सगळ्यात पुढे दाखवण्यात आलं होतं. याशिवाय आरसीबीच्या विराट कोहलीचं कार्टूनही यामध्ये दिसत होतं. या फोटोंमध्ये जवळपास सगळ्याच टीम असल्या तरी राजस्थान दिसत नव्हतं, यावरून संजू सॅमसनच्या पत्नीने नाराजी व्यक्त केली आहे. ‘आयपीएलच्या पहिल्या दिवशी दावेदारांचा हा ऍनिमेटेड व्हिडिओ दाखवण्यात आला. यामध्ये गुलाबी जर्सी का नव्हती, असं तेव्हाही मला जाणवलं होतं,’ असं चारुलताने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये म्हणलं आहे. या स्टोरीला तिने ‘आणि फायनल,’ असं कॅप्शन दिलं.

राजस्थानची टीम फायनलला पोहोचल्यानंतर चारुलताने योग्य टायमिंग साधत प्रसारणकर्त्यांवर निशाणा साधला. राजस्थान रॉयल्सने याआधी 2008 साली झालेली पहिली आयपीएल जिंकली होती, त्यानंतर पहिल्यांदाच त्यांनी फायनलमध्ये प्रवेश केला आहे. दुसरीकडे गुजरात टायटन्सच्या टीमसाठी ही पहिलीच आयपीएल आहे. आयपीएल पॉईंट्स टेबलमध्ये गुजरात पहिल्या आणि राजस्थान दुसऱ्या क्रमांकावर होत्या. गुजरातने 14 पैकी 10 मॅच जिंकल्या तर राजस्थानला 14 पैकी 9 मॅच जिंकता आल्या. पहिल्या क्वालिफायरमध्ये गुजरातने राजस्थानचा पराभव करत फायनल गाठली, यानंतर एलिमिनेटरमध्ये लखनऊचा पराभव करणाऱ्या आरसीबीविरुद्ध राजस्थानला क्वालिफायर 2 चा सामना खेळावा लागला, या सामन्यात विजय मिळवून राजस्थान फायनलमध्ये पोहोचली आहे. याआधी लीग स्टेजमध्येही गुजरातने राजस्थानचा पराभव केला होता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या