JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / ...माहीचा Winning Six! साक्षी-झिवाची अशी होती रिअ‍ॅक्शन; VIDEO VIRAL

...माहीचा Winning Six! साक्षी-झिवाची अशी होती रिअ‍ॅक्शन; VIDEO VIRAL

धोनीच्या चेन्नई टीमने हैद्राबादवर 7 विकेट्सनी विजय मिळवत संघाला यंदाच्या पर्वात सर्वात प्रथम प्लेऑफमध्ये (CSK in Play-off IPL 2021) स्थान मिळवून दिले. सीएसकेच्या या विजयाने चाहते भारावुन गेलेत परंतु सध्या धोनीची पत्नी साक्षीची रिअॅक्शन सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे.

जाहिरात

MS Dhoni चा फिनिशिंग टच पाहताच पत्नी साक्षीची अशी होती रिअॅक्शन

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 1 ऑक्टोबर: सीएसकेचा कर्णधार महेंद्र सिंह धोनीने (MS Dhoni CSK) आपल्या जुन्या फिनिशिंग टचने हैद्राबादवर 7 विकेट्सनी विजय (IPL 2021 CSK vs SRH) मिळवत संघाला यंदाच्या पर्वात सर्वात प्रथम प्लेऑफमध्ये (CSK in Play-off IPL 2021) स्थान मिळवून दिले. आयपीएलच्या मागच्या मोसमात चेन्नई सुपर किंग्सला प्ले-ऑफमध्ये पोहोचता आले नव्हते. यावर्षी मात्र त्यांनी पुन्हा एकदा धमाका केला. सीएसकेच्या या विजयाने चाहते भारावुन गेलेत परंतु सध्या धोनीची पत्नी साक्षीची रिअॅक्शन  (MS Dhoni Wife Sakshi’s Reaction as MS Dhoni Hits Winning Six) सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे. धोनीची पत्नी साक्षी हिचा एक व्हिडिओ आयपीएलच्या ट्विटर अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओत साक्षी आणि मुलगी झिवा दिसीत आहेत. सामना अखेरच्या क्षणी असताना साक्षी तणावात असल्याचे पाहायला मिळाले. परंतु धोनीच्या फिनिशिंग सिक्सने साक्षीचा संपूर्ण तणाव दुर झाला. धोनीची फिनिशिंग सिक्स आणि सीएसके संघाचा प्ले-ऑफमध्ये प्रवेश पाहताच साक्षी आच्छर्याने उठली अ्न शेजारच्या व्यक्तीली आनंदाने टाळी देऊ लागली. तिचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतं आहे.

संबंधित बातम्या

आयपीएलच्या मागच्या मोसमात चेन्नई सुपर किंग्सला प्ले-ऑफमध्ये पोहोचता आले नव्हते. आयपीएल इतिहासात पहिल्यांदाच चेन्नईची टीम प्ले-ऑफ खेळली नव्हती. यावर्षी मात्र त्यांनी पुन्हा एकदा धमाका केला आहे. 11 पैकी 9 मॅचमध्ये चेन्नईचा विजय झाला, तर फक्त 2 सामने त्यांनी गमावले आहेत. हे वाचाः  ‘कॅप्टन कूल’ MS Dhoni चं अनोखं शतक; नेटकरी म्हणतायत ‘बंदे मे अभी दम है’ हैदराबाद सनरायझर्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज (Hyderabad vs Chennai) यांच्यातील सामना सीएसकेने 6 गडी राखून जिंकला. हैदराबादचे 135 धावांचे आव्हान चेन्नईने शेवटच्या षटकापर्यंत झुंज देत पार केले. धोनीने 3 चेंडूत 2 धावांची गरज असताना षटकार ठोकला आणि संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. हे वाचा स्मृती मंधानाचं दमदार शतक, ऐतिहासिक कामगिरी करणारी पहिली भारतीय या विजयासह धोनीनं सीएसकेच्या फॅन्सना वर्षभरापूर्वी दिलेला शब्द पाळला आहे. धोनीनं मॅच संपल्यानंतर सांगितले की, ‘या गोष्टीला (प्ले ऑफमध्ये प्रवेश) खूप महत्त्व आहे. कारण, आम्हाला कमबॅक कराचे आहे, असे मागच्या वर्षी मी सांगितले आहे. त्या गोष्टीपासून आम्ही सर्वांनी धडा घेतला. खेळाडू आणि सपोर्ट स्टाफला याचे पूर्ण श्रेय असल्याचे धोनीने म्हटले आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या