नवी दिल्ली, 14 एप्रिल: इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) आयपीएलटी-20 क्रिकेटस्पर्धा (IPL)सध्या सुरू आहे. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्स टीम आणि इयॉन मॉर्गनच्या (Eoin Morgan) नेतृत्वाखाली कोलकाता नाईड रायडर्स (Kolkata Knight Riders) टीम यांच्यामधली मॅच 13 एप्रिलला चेन्नईच्या एम. ए. चिदंबरम स्टेडियमवर झाली. आयपीएल स्पर्धेतली ही पाचवी मॅच होती. कोलकाता नाईट रायडर्सचा कॅप्टन मॉर्गनने टॉस जिंकून सुरुवातीला बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. मुंबई इंडियन्स टीमने सुरुवातीला बॅटिंग करताना 20ओव्हर्समध्ये सर्व विकेट्स गमावून 152 रन्स केले. नंतर कोलकाता टीम बॅटिंगला आली. त्यांनी 13 ओव्हर्समध्ये तीन विकेट्स गमावून 104 रन्स केले होते. 14व्या ओव्हरला मुंबई टीमचा कॅप्टन रोहित शर्मानेच चेंडू हाती घेतला. ओव्हरचा पहिला चेंडू टाकण्याआधीच तो अस्वस्थ असल्याचं दिसत होतं. तरीही त्याने बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. ओव्हरचा पहिलाच बॉल टाकण्यासाठी त्याने पूर्ण अॅक्शन घेतली, तेवढ्यात त्याचा डावा पाय (Rohit Sharma) मुरगळला. पाय मुरगळल्यानंतर रोहित शर्मा खूप अस्वस्थ झाल्याचं दिसलं. त्यामुळे पहिला बॉल टाकण्याआधीच तो जमिनीवर बसला. त्यानंतर मुंबई इंडियन्स टीमच्या फिजिशियनला मैदानावर यावं लागलं. त्याच्यावर प्राथमिक उपचार केल्यानंतर रोहितने आपली ओव्हर तर पूर्ण केलीच आणि तो मॅच पूर्ण होईपर्यंत खेळलाही. ‘स्पोर्ट्झविकी’ने याबद्दलचं वृत्त दिलं आहे. रोहितला दुखापत झालेल्या या क्षणाचा व्हिडीओ सोशल मीडियावरही व्हायरल झाला आहे.
या मॅचद्वारे मुंबई इंडियन्स टीमने यंदाच्या हंगामातला आपला पहिला विजय नोंदवला. मुंबई इंडियन्सच्या सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) 56 आणि कॅप्टन रोहित शर्माने 43 रन्स केले. 20 ओव्हर्समध्ये ही टीम सर्व विकेट्स गमावून 152 रन्स करू शकली. कोलकाता नाइटरायडर्स टीमकडून बॉलिंग करताना आंद्रे रसेलने दोन ओव्हर्समध्ये फक्त 15 रन्स देऊन पाच विकेट्स घेतल्या.
152 रन्सचा पाठलाग करताना कोलकाता नाईट रायडर्स टीम बराच वेळ मजबूत स्थितीत होती, पण मुंबईच्या राहुल चाहरने (Rahul Chahar) उत्तम बॉलिंग करून कोलकात्याच्या चार विकेट्स घेतल्या. नितीश राणाने (Nitish Rana) 57, तर शुभमन गिलने (Shubhman Gill) 33 रन्स केल्या. मात्र त्यांची खेळी संघाला विजयाप्रत नेऊ शकली नाही. कोलकात्याचा संघ 20 ओव्हर्समध्ये सर्व गडी गमावून 142 रन्सच करू शकला. त्यामुळे मुंबई इंडियन्स टीमचा विजय झाला. राहुल चाहर मॅन ऑफ द मॅच ठरला.