JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IPL 2021 : धोनीच्या 'त्या' एका कृत्यामुळे सोशल मीडियावर सुरू झाला fixerkings हा ट्रेंड

IPL 2021 : धोनीच्या 'त्या' एका कृत्यामुळे सोशल मीडियावर सुरू झाला fixerkings हा ट्रेंड

चेन्नई सुपर किंग्सचा (Chennai Super Kings) कॅप्टन महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) काल जुन्या फर्मात दिसला. दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) विरुद्ध 6 बॉलमध्ये नाबाद 18 रनची खेळी केली. सामन्याच्या विजयानंतर काही नेटकऱ्यांनी #fixerkings हा ट्रेंड सुरु केला आहे.

जाहिरात

धोनीच्या 'त्या' एका कृतीमुळे सुरू झाला fixerkings हा ट्रेंड

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

दुबई, 11 ऑक्टोबर: चेन्नई सुपर किंग्सचा (Chennai Super Kings) कॅप्टन महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) काल जुन्या फर्मात दिसला. दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) विरुद्ध 6 बॉलमध्ये नाबाद 18 रनची खेळी केली. त्यानं शेवटच्या ओव्हरमध्ये केलेल्या फटकेबाजीमुळे सीएसकेनं (CSK) आयपीएल फायनलमध्ये (IPL 2021 Final) प्रवेश केला. पण सोशल मीडियावर एक वेगळीच चर्चा रंगली आहे. सामन्याच्या विजयानंतर काही नेटकऱ्यांनी #fixerkings हा ट्रेंड सुरु केला आहे.

धोनीच्या ‘त्या’ एका कृतीमुळे सुरू झाला fixerkings हा ट्रेंड

दिल्लीच्या डावातील शार्दूल ठाकूरनं टाकलेल्या 16 व्या षटकात रिषभ पंत स्ट्राईकवर असताना अम्पायरने 6 वा बॉल वाइड दिले. तो ऑफ साईडला बराच बाहेर जात होताच आणि अम्पायरने निर्णय दिला. शार्दूलला या निर्णयावर काही खूश दिसला नाही आणि ते षटक संपताच महेंद्रसिंग धोनीनंही अम्पायरकडे त्या निर्णयाचा जाब विचारला. धोनीचे ते फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. हे वाचा-   हार्दिक पांड्याच्या फिटनेसचं निवड समितीला टेन्शन, शेवटच्या क्षणी होणार बदल मागील पर्वात धोनीचा रुद्रावतार पाहून अम्पायर वाइड निर्णय देता देता थांबले होते आणि आता कालच्या सामन्यातही तसेच काहीसे घडल्यामुळे सोशल मीडियावर #fixerkings हा ट्रेंड सुरू झाला आहे. या सामन्यात चेन्नईच्या खेळाडूंकडूनही क्षेत्ररक्षणात अक्षम्य चुका झाल्या असल्याचे नेटकऱ्यांचे म्हणणे आहे.

मात्र, धोनीची फटकेबाजी पाहताना फॅन्सच्या उत्साहाला उधाण आले होते. धोनची पत्नी साक्षीसह चाहत्यांदेखील अश्रु अनावर झाले.

हे वाचा-   IPL फायनलपूर्वी Dream11 ला मोठा धक्का, ‘या’ राज्यातील कारभार झाला बंद दिल्लीने दिलेल्या 173 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईची सुरुवात खराब झाली. फॉर्ममध्ये असलेला फाफ डुप्लेसिस फक्त 1 रन करून आऊट झाला, पण प्रत्युत्तरात रॉबीन उथप्पा ( 63) व ऋतुराज गायकवाड ( 70) यांच्या 110 धावांच्या भागीदारी नंतर महेंद्रसिंग धोनीनं ( MS Dhoni) 6 चेंडूंत ३ चौकार व 1 षटकार खेचून नाबाद 18 धावा करताना चेन्नईला फायनलमध्ये प्रवेश मिळवून दिला. चेन्नईला अखेरच्या षटकात 13 धावा हव्या होत्या. टॉम कुरनच्या षटकात धोनीनं तीन खणखणीत चौकार खेचले. चेन्नईने 4 विकेट्स राखून हा सामना जिंकला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या