JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / RCB vs KKR Live Score: कोलकाताचा विराट सेनेवर 'रॉयल' विजय, अवघ्या 10 ओव्हरर्समध्ये खेळ खल्लास

RCB vs KKR Live Score: कोलकाताचा विराट सेनेवर 'रॉयल' विजय, अवघ्या 10 ओव्हरर्समध्ये खेळ खल्लास

रॉयल चॅलेंजर्सनं दिलेल्या 92 धावांचे माफक आव्हान कोलकाताने अवघ्या 10 ओव्हरर्समध्ये 94 धावांमध्ये पूर्ण केले.

जाहिरात

रॉयल चॅलेंजर्सनं दिलेल्या 92 धावांचे माफक आव्हान कोलकाताने अवघ्या 10 ओव्हरर्समध्ये 94 धावांमध्ये पूर्ण केले.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

दुबई, 20 सप्टेंबर : दुबईमध्ये (dubai) सुरू असलेल्या आयपीएलच्या (ipl 2021) दुसऱ्या हंगामात आज कोलकाता नाईटरायडर्सच्या टीमने  (kkr) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (rcb) चा पार सुपडा साफ केला आहे. अवघ्या 10 ओव्हरमध्ये कोलकाताने 94 धावा करून सामना खिश्यात घातला आहे. रॉयल चॅलेंजर्सनं दिलेल्या 92 धावांचे माफक आव्हान कोलकाताने अवघ्या 10 ओव्हरर्समध्ये 94 धावांमध्ये पूर्ण केले. कोलकाताकडून शुभमन गिलने सर्वाधिक 48 धावा करून विजयाचा मार्ग मोकळा केला. तर व्यंकटेश अय्यरने 41 धावांची नाबाद खेळी करत विजय मिळवला. रॉयल्स चॅलेंजर्सकडून युजवेंद्र चहल फक्त गडी बाद करण्याचे यश मिळाले. चहलने शुभमन गिलला 48 धावांवर बाद केले. त्याआधी कोलकाता नाइटराइडर्सच्या विरोधात विराट कोहलीच्या (virat kohali) टीमची चांगलीच धुळधान उडाली. संपूर्ण टीम अवघ्या  92 रन्सवर ऑल आउट झाली . केकेआरकडून वरुण चक्रवर्ती आणि आंद्रे रसेल यांनी प्रत्येक तीन विकेट घेऊन रॉयल चॅलेंजरला भगदाड पाडले. तर  फास्टर बॉलर कृष्णाने विराट कोहलीला आऊट केलं. SRPF Recruitment: राज्य राखीव पोलीस बल मुंबई इथे ‘या’ पदासाठी नोकरीची संधी आयपीएलमध्ये 200 वा सामना खेळणाऱ्या विराटने टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. पण, त्याचा हा निर्णय घातक ठरला. ओपनिंग आलेली जोडी झटपट बाद झाली. विराट फक्त 5 धावा करून माघारी परतला. त्यानंतर आरसीबीची कमान देवदत्त पडिक्कलने सांभाळली खरी पण तोही सर्वाधिक 22 रन्स करून बाद झाला. पाकिस्तानची मोठी नाचक्की! न्यूझीलंडपाठोपाठ इंग्लंडनेही केला दौरा रद्द त्यानंतर पहिलाच सामना खेळणाऱ्या  केएस भरतने 16 रन्स केले.  आरसीबी के बल्लेबाज एबी डिविलियर्स आणि हसारंगा गोल्डन  भोपळाही फोडू शकले नाही.  मॅक्सवेल 17 धावांवर 10 रन्स करून बाद झाला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या