JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / VIDEO: मुंबई इंडियन्सच्या टीम रूमची Virtual Tour, पाहून तुम्हीही म्हणाल...'करा मला क्वारंटाइन'

VIDEO: मुंबई इंडियन्सच्या टीम रूमची Virtual Tour, पाहून तुम्हीही म्हणाल...'करा मला क्वारंटाइन'

जिम, गेम्स आणि फॅन वॉल! मुंबई इंडियन्सच्या टीम रूमची Virtual Tour पाहिलीत का? पाहा VIDEO

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

दुबई, 09 सप्टेंबर : आयपीएलच्या (IPL 2020) तेराव्या हंगामाला लवकरच सुरुवात होणार आहे. 19 सप्टेंबरपासून या स्पर्धेला सुरुवात होणार असून पहिलाच सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्ज यांच्यात होणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघांच्या खेळाडूंनी जय्यत तयारी करण्यात सुरुवात केली आहे. मात्र कोरोनामुळे खेळाडूंना काही नियम पाळावे लागत आहेत. यासाठीच फ्रेंचाजझीने आपल्या संघासाठी एक टीम रुम तयार केली आहे. नुकत्याच मुंबई इंडियन्स संघाच्या टीम रुमची Virtual Tour कृणाल पांड्यानं चाहत्यांना करवली. कोरोनामुळे खेळाडूंना क्वारंटाइन आणि सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळावे लागत आहे. मात्र या टीम रुममुळे खेळाडूंचे आयुष्य सुखकर झाले आहे. कृणाल पांड्यानं घडवून आणलेल्या या Virtual Tour मध्ये मुंबई इंडियन्सची टीम रुम सर्वात मोठी असल्याचे दिसत आहे. ही फक्त टीम रुम नसून यात जिम, गेम्स, फॅन वॉल, लहान मुलांसाठी रूम, गाण्यासाठी जागा अशा सर्व सुविधा आहेत. वाचा- फक्त 27 चेंडूत संपला सामना, मोडला मुंबई इंडियन्सचा 12 वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड

वाचा- IPL 2020, MI Schedule: कधी, कोणत्या टीमला टक्कर देणार रोहितची मुंबई इंडियन्स हा व्हिडीओ पाहिल्यानंतर खरतर तुमच्या मनात प्रश्न येईल की, हे असं क्वारंटाइन असेल तर आम्हालाही आवडेल. कृणाल पांड्यानं या टुअरमध्ये मुंबई इंडियन्सची फॅन वॉल तसेच या संपूर्ण टीम रुमचे दर्शन घडवले.

वाचा- रोहित शर्मा नाही तर ‘हा’ खेळाडू IPL मध्ये मारू शकतो डबल सेंच्यूरी मुंबई इंडियन्सनं चाहत्यांसाठी या खास Virtual Tourचे आयोजन केले होते. मुंबई इंडियन्सचा संघ रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली 19 सप्टेंबरपासून आयपीएलला सुरुवात करेल. यावेळी मुंबईच्या संघाच्या मॅन विनर गोलंदाज लसिथ मलिंग नसले. मलिंगाने वैयक्तिक कारणामुळे आयपीएलमधून माघार घेतली आहे. त्यामुळे संघाच्या गोलंदाजीची धुरा जसप्रीत बुमराहवर असेल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या