यंदाच्या आयपीएलमध्ये संघाना मिळणारी रक्कम कमी करण्यात आली असली तरी, खेळाडूंना याचा तोटा होणार नाही आहे. मुंबई इंडियन्सचे खेळाडू इतर संघातील खेळाडूंपेक्षा जास्त कमवतात. मुंबई संघात सर्वात जास्त पगार तो कर्णधार रोहित शर्माचा.
मुंबई, 18 नोव्हेंबर : आयपीएलच्या 13व्या हंगामासाठी सर्व संघ सज्ज आहेत. त्याआधी डिसेंबरमध्ये खेळाडूंला लिलाव होणार आहे. त्याआधी आठही संघानी मुख्य खेळाडूंना रिटेन करण्याचा तर इतर खेळाडूंना संघाबाहेर करण्याचा निर्णय घेतला. असे असले तरी, आयपीएलमध्ये सर्वाधिक विजेतेपद असलेल्या मुंबई इंडियन्स संघाच्या अडचणी संपलेल्या नाही आहेत. आयपीएलचे गतविजेते मुंबई इंडियन्स संघाचा संचालक जहीर खाननं संघाच्या तयारीबाबत माहिती दिली. जहीर खाननं यावेळी गोलंदाजीमध्ये संघाला चांगली कामगिरी करावी लागणार असल्याचे सांगितले. त्याचप्रमाणे आयपीएलच्या ट्रेडमध्ये खेळाडूंना रिटेन करण्याचा निर्णय घेतला. मुंबई संघानं मुख्य खेळाडूंना संघातच ठेवले आहे. यात श्रीलंकेचा माजी कर्णधार आणि सर्वोत्तम गोलंदाज लसिथ मलिंगाच्या नावाचाही समावेश आहे. मुंबई इंडियन्सनं एकूण 18 खेळाडूंना रिटेन केले तर 12 खेळाडूंना रिलीज केले. वाचा- IPL लिलावाआधी बंगळुरू आणि मुंबई संघानं दिग्गजांना डच्चू, 19 खेळाडू संघाबाहेर मुंबई संघाने ट्रेंट बोल्ट, वेस्ट इंडिजचा शेरफाने रदरफोर्ड आणि मुंबईकर धवल कुलकर्णीला ट्रेड केले आहे. याबाबत जहीर खाननं दिलेल्या माहितीनुसार, “मुंबई संघ सध्या स्थिर आणि अनुभवी आहे. यावर्षी संघात काही बदल होती. तसेच, दुखापतीमुळे संघाच्या समस्या वाढल्या आहेत. हार्दिक पांड्या पाठीच्या दुखापतीमुळे त्रस्त असला तरी, तो कमबॅक करेल”, अशी आशा व्यक्त केली. हार्दिक पांड्याबरोबरच मुंबईचा महत्त्वाचा गोलंदाज जसप्रीत बुमराहची दुखापतीमुळे बाहेर आहे तर जेसन बेहरनडॉर्फही पाठीच्या दुखापतीमुळे त्रस्त आहे. याबाबत सांगताना जहीरनं, “खेळाडूंची दुखापत ही चिंतेची बाब आहे. ही बाब लक्षात घेता, खेळाडूंचा ट्रेड करण्यात आला. त्यामुळं आम्ही जास्तीत जास्त गोलंदाजीवर भर देत आहोतठ, असे सांगितले.
वाचा- वडील 94 हजार कोटींचे मालक पण अवघ्या 30 लाखांसाठी IPL खेळत होता मुलगा मुंबई इंडियन्स संघाने 7 खेळाडूंना केले रिलीज युवराज सिंग, इविन लेव्हिस, एडम मिलने, जेसन बेहरेनडॉर्फ, बरिंदर सरां, बेन कटिंग, पंकज जयस्वाल. वाचा- ‘संकटमोचक’ मुंबईकरालाच रोहितनं दिला डच्चू, 4 वर्षात फक्त एकदा दिली संधी सर्वाधिक विजेतेपद मुंबईकडे आयपीएलमध्ये यावर्षी चेन्नईचा पराभव करून मुंबईने विजेतपद मिळवले. आयपीएलच्या 12 हंगामात मुंबईने सर्वाधिक 4 विजेतेपद मिळवले आहेत. तर धोनीच्या संघाने 3 वेळा विजेतेपद मिळवले आहे. कोलकाता संघाने दोन वेळा तर हैदराबाद डेक्कन चार्जर्स आणि सनरायझर्स हैदराबाद, राजस्थान रॉयल्स यांनी प्रत्येकी एक वेळा विजेतेपद मिळवले आहे. यंदाचा आयपीएलचा अंतिम सामना 18.6 मिलियन लोकांनी पाहिला होता. तर जाहिरातीतून मिळणाऱ्या उत्पन्नात 20 टक्क्यांनी फायदा झाला आहे.