JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / अखेर झाली धोनीच्या कमबॅकची घोषणा, CSKने शेअर केला खास VIDEO

अखेर झाली धोनीच्या कमबॅकची घोषणा, CSKने शेअर केला खास VIDEO

दोन वेळा विश्वविजेता भारतीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी 2019च्या इंग्लंडमधील वर्ल्ड कपनंतर ब्रेकवर आहे.

जाहिरात

तिसऱ्या क्रमांकावर आहे नवा कॅप्टन कुल केन विल्यम्सन. विल्यम्सननं 2016मध्ये बंगळुरू हरवत पहिल्यांदा सनरायजर्स हैदराबाद संघाला पहिले विजेतेपद मिळवून दिले. त्यानंतर 2018मध्ये फायनलपर्यंत मजल मारली. मात्र गेल्या हंगामात केननं प्ले ऑफपर्यंत मजल मारली होती. केनला आयपीएलमधला कॅप्टन कूल असे नाव आहे.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

चेन्नई, 15 फेब्रुवारी : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या पुनरागमनाबाबत अनेक तर्क वितर्क लावले जात असतात. क्रिकेट चाहत्यांच्या मनात धोनी निवृत्त तर घेणार नाही ना? हा प्रश्न कायम असतो. मात्र अखेर धोनी चाहत्यांना त्याच्या प्रश्नांचे उत्तर मिळाले आहे. कारण 38 वर्षीय दिग्गज यष्टिरक्षक फलंदाज क्रिकेटच्या मैदानात परतण्यासाठी सज्ज आहे. मीडिया रिपोर्टनुसार धोनीने आयपीएल 2020 ची आपली योजना तयार केली आहे.

संबंधित बातम्या

वाचा- IPLआधी मुंबई इंडियन्सला सर्वात मोठा झटका, दिग्गज प्रशिक्षकाने सोडली साथ CSKसोबत लवकरच धोनी करणार सराव चेन्नई सुपर किंग्जचे (CSK) प्रशिक्षण शिबिर 1 मार्चपासून सुरू होत आहे. 29 फेब्रुवारी रोजी धोनी चेन्नईला पोहचणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. या वेळी आयपीएलची सुरुवात 29 मार्चपासून होईल. दुसरीकडे असे म्हणतात की सीएसकेनेही आपल्या ‘थाला’च्या स्वागतासाठी विशेष तयारी केली आहे. वाचा- RCB च्या लोगोवरून विराट आधी भडकला आता म्हणतो, ‘लोगो’ का काम होता है कहना वर्ल्ड कपमधील पराभवानंतर धोनी ब्रेकवर दोन वेळा विश्वविजेता भारतीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी 2019च्या इंग्लंडमधील वर्ल्ड कपनंतर ब्रेकवर आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमादरम्यान धोनीला त्याच्या परतीविषयी विचारले असता, जानेवारीपर्यंत विचारू नका, असे उत्तर दिले होते. वाचा- प्रिती झिंटाला मोठा झटका, 10.75 कोटींना विकत घेतलेला खेळाडू IPL खेळणार नाही बीसीसीआयने करारातून वगळले वर्षाच्या सुरूवातीला (16 जानेवारी) बीसीसीआयने धोनीला करार यादीतून वगळले. परंतु धोनीने रांची येथे आपल्या घरच्या संघासह झारखंडसह सराव सत्रात भाग घेतला. आता आगामी इंडियन प्रीमियर लीगमध्ये धोनीने कमबॅकचे संदेश दिले आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या