नवी दिल्ली, 5 ऑक्टोबर : दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) संघाचा महत्त्वाचा खेळाडू लेगस्पिनर अमित मिश्रा (Amit Mishra) IPL 2020 च्या स्पर्धेबाहेर पडला आहे. शनिवारी KKR कोलकात्याच्या संघाविरुद्ध (Kolkata Knight Riders) झालेल्या सामन्यात फील्डिंग करतेवेळी अमित मिश्राच्या बोटाला दुखापत झाली. आता ही दुखापत लवकर बरी होणारी नसल्यामुळे अमित मिश्रा पुढच्या सगळ्या सामन्यांना मुकणार आहे. IPL मधूनच त्याला माघारी यावं लागणार असल्याचं वृत्त ANI ने दिलं आहे. KKR विरुद्धच्या सामन्यात दोनच ओव्हर टाकून झाल्यानंतर अमित मिश्राच्या बोटाला लागलं. त्याला मैदानावरून परत जावं लागतं. आता त्याच्या दुखापतीचं गांभीर्य स्पष्ट झालं आहे. दिल्ली संघाच्या वतीने ANI ला दिलेल्या माहितीनुसार, ‘अमित मिश्राच्या दुखापतीचे वैद्यकीय अहवाल आले आहेत आणि वाईट बातमी आहे. IPL 2020 च्या उर्वरित हंगामात हा बोलर खेळू शकणार नाही. त्याच्याऐवजी बदली खेळाडू आम्हाला खेळवावा लागेल. अमित खूप चांगल्या फॉर्ममध्ये होता आणि चांगली कामगिरी करत होता. त्याच्यासारख्या अनुभवी खेळाडूचा टीममधल्या इतर तरुण खेळाडूनाही फायदा झाला होता.’ मिश्राच्या बोटाचा स्नायू - टिंडॉन टिश्यू दुखावला आहे. त्यामुळे तो गोलंदाजी करू शकणार नाही. या दुखापतीतून बाहेर येण्यासाठी बोटाची हालचाल कमी ठेवावी लागणार आहे. त्यामुळे त्याला पुन्हा मैदानावर बोलिंग करायला येण्यासाठी वेळ लागू शकतो. चेन्नई विरुद्ध पंजाब सामना होता फिक्स? शेन वॉट्सनच्या ट्वीटमुळे चाहते संभ्रमात मिश्राचा या हंगामातला खेळ खूपच उत्तम होत होता. तीन सामन्यांमध्ये त्याने 0/23, 2/35 आणि 1/14 इतक्या कमी धावा दिल्या होत्या. आतापर्यंतच्या IPL च्या इतिहासात सर्वाधिक बळी घेणाऱ्या खेळाडूंच्या यादीत त्याचं नाव आहे. या यादीत सर्वोच्च स्थानी असणाऱ्या लसिथ मलिंगापेक्षा त्याच्या फक्त 10 विकेट्स कमी आहेत. पण आता मात्र पुढचा हंगाम खेळणं अवघड असल्यामुळे दिल्ली कॅपिटल्सबरोबर अमित मिश्राचंही मोठं वैयक्तिक नुकसान होणार आहे. IPL 2020 : इशान किशनच्या एका कॅचने मॅच फिरली, पाहा VIDEO आता दिल्ली कॅपिटल्स अमित मिश्राऐवजी अक्षर पटेलचा विचार करू शकते. दिल्लीपुढे आणखी एक मोठं संकट म्हणजे आघाडीचा फलंदाज पृथ्वी शॉ याची दुखापत हेसुद्धा आहे. मागच्या सामन्यात खेळताना पृथ्वीच्या पायाला बॉल लागला. त्यानंतर दुसऱ्या इनिंगमध्ये पृथ्वी फील्डिंगसाठी मैदानावर दिसला नाही. तो बायाला बर्फाने शेकत असल्याचं दिसून आलं.