JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IPL 2020 आधी BCCI ने घेतला मोठा निर्णय, विजेत्यांसह इतर संघांना बसणार आर्थिक दणका

IPL 2020 आधी BCCI ने घेतला मोठा निर्णय, विजेत्यांसह इतर संघांना बसणार आर्थिक दणका

यंदाच्या IPL मध्ये विजेत्यांसह इतर संघाचे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. बीसीसीआयने स्पर्धेआधी अनेक नियमांत बदल करण्याचा प्रस्ताव दिला आहे.

जाहिरात

जगभरातील क्रिकेटप्रेमींसाठी पर्वणी असेलली इंडियन प्रिमिअर लीग (IPL) ही स्पर्धा यंदा कोरोनाच्या संकटामुळे पुढे ढकलण्यात आली.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 04 मार्च : जगातील सर्वात श्रीमंतर क्रिकेट बोर्ड असलेल्या बीसीसीआय़लाही मंदीचा फटका बसत असल्याचं दिसत आहे. यंदाच्या आयपीएल स्पर्धेत त्याचा प्रभाव पडणार आहे. आयपीएलमध्ये अनेक गोष्टींवर होणाऱ्या खर्चात कपात करण्यात येणार आहे. आयपीएलच्या आठ फ्रँचाइजीसह इतर संबंधितांना एक पत्र पाठवण्यात आलं आहे. त्यात म्हटलं आहे की, आयपीएलच्या उद्घाटनाचा सोहळा होणार नाही. तसेच प्ले ऑफ स्टँडिंग फंडही कमी करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. बीसीसीआयने म्हटलं की,‘आयपीएल 2020 च्या विजेत्याला 10 कोटी रुपये तर उपविजेत्याला 6.25 कोटी रुपये देण्यात येतील. तर प्ले ऑफ मध्ये पराभूत होणाऱ्या संघांना प्रत्येकी 4.37 कोटी रुपये दिले जातील. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा प्ले ऑफ स्टँडिंग फंडात 50 टक्के रक्कम कमी करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. यावर सध्या सर्व फ्रँचाइजींची चर्चा सुरू आहे. आयपीएलच्या 2019 च्या हंगामात मुंबईने इंडियन्सने विजेतेपद पटकावलं होतं. मुंबई इंडियन्सला 20 कोटी रुपये मिळाले होते. या रकमेचे सर्व खेळाडूंमध्ये समान वाटप करण्यात आलं होतं. तर उपविजेत्या संघाला 12.5 कोटी रुपये देण्यात आले होते. तर राज्य संघाला प्रत्येक सामन्यासाठी 50 लाख रुपये दिले होते. आता यापुढे राज्य संघाला प्रत्येक आयपीएल सामन्यासाठी 1 कोटी रुपये दिले जातील. हे वाचा : फॉर्ममध्ये नाही म्हणून क्रिकेटमधून घेतला ब्रेक, आता कम बॅक करताना रचला इतिहास खर्च कमी करण्यासाठी बीसीसीआय़ने कर्मचाऱ्यांच्या प्रवासासाठी नवे नियम तयार केले आहेत. याआधी तीन तासांपेक्षा जास्त विमान प्रवासासाठी वरिष्ठ कर्मचाऱ्यांना बिझनेस क्लासचं तिकिट असायचं. पण आता 8 तासांपेक्षा कमी वेळेसाठीही इकॉनॉमी क्लासमधून प्रवास करावा लागेल. तीन वरिष्ठ अधिकारी वगळता सर्वांसाठी हा नियम लागू असणार आहे. हे वाचा : 16 व्या वर्षी फक्त 18 सामने खेळून झाली नंबर वन, दिग्गजही पडले मागे

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या