JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IPL DC Vs CSK: 'मोदीजी आता तुम्हीच समजवा', धोनीच्या त्या निर्णयावर सेहवागनं पंतप्रधानांकडे मागितली मदत

IPL DC Vs CSK: 'मोदीजी आता तुम्हीच समजवा', धोनीच्या त्या निर्णयावर सेहवागनं पंतप्रधानांकडे मागितली मदत

आयपीएलच्या या हंगामातील धोनीचा हा सलग दुसरा पराभव आहे. याआधी राजस्थान रॉयल्सविरुद्ध चेन्नईला 16 धावांनी पराभव स्विकारावा लागला होता.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 26 सप्टेंबर : आयपीएलच्या (IPL 2020) तेराव्या हंगामात शुक्रवारी चेन्नई सुपर किंग्जला (Chennai Supe Kings) आणखी एका पराभवाचा सामना करावा लागला. दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) संघाने धोनीच्या संघाला 44 धावांनी पराभूत केले. आयपीएलच्या या हंगामातील धोनीचा हा सलग दुसरा पराभव आहे. याआधी राजस्थान रॉयल्सविरुद्ध चेन्नईला 16 धावांनी पराभव स्विकारावा लागला होता. यासह गुणतालिकेत CSK पाचव्या क्रमांकावर आहे. मात्र या दोन्ही पराभवांसाठी क्रिकेट एक्सपर्ट धोनीला कारणीभूत ठरवत आहेत. धोनीनं कोणत्या क्रमांकावर फलंदाजीसाठी यावे, यावरून आता वाद सुरू झाल आहे. चाहते आणि क्रिकेट एक्सपर्टनुसार धोनीनं चौथ्या किंवा पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करण्याचा सल्ला दिला आहे. मात्र धोनी गेल्या 2 सामन्यांमध्ये सहाव्या किंवा सातव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी येत आहे. यावरून आता भारताचा माजी फलंदाज वीरेंद्र सेहवागनेही धोनीच्या या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. वाचा- सुपरमॅन नाही हा तर आपला धोनी! डोळ्यांच्या पापण्या मिटण्याआधी घेतला जबरदस्त कॅच काय म्हणाला सेहवाग? वीरेंद्र सेहवागनं धोनीनं हट्ट सोडावा, संघाच्या परिस्थितीनुसार त्यानं फलंदाजी करावी, असा सल्ला दिला आहे. सेहवागनं फेसबुकवर केलेल्या खास शोमध्ये, “चेन्नईचा संघ अडचणीत होता, मात्र थाला (धोनी) फलंदाजीला आला नाही. असं वाटत होतं की बुलेट ट्रेन येईल, पण धोनी चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी येणार नाही. मोदीजी आता तुम्हीच सांगा याला”. वाचा- CSK vs DC Live: चेन्नईनं गमावला सलग दुसरा सामना, दिल्लीचा 44 धावांनी विजय

धोनीनं केलं बॅटिंग पोझिशनचं समर्थन केवळ सेहवागचं नाही तर याआधी गौतम गंभीरनेही धोनीवर टीका केली होती. मात्र धोनी दिल्लीविरुद्ध झालेल्या सामन्यात सहाव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला. धोनी आला तेव्हा 17 ओव्हर खेळून झाले होते. अखेरच्या ओव्हरमध्ये धोनीनं 12 चेंडूत 17 धावा केल्या आणि बाद झाला. वाचा- ‘या’ सात गेम्सच्या माध्यमातून IPLमध्ये घरबसल्या जिंका कोट्यवधी रुपये याआधी धोनी राजस्थान आणि मुंबई दोन्ही संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात सातव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरला होता. राजस्थानविरुद्ध सामन्यात धोनीनं बॅटिंग पोझिशनचं समर्थनही केले होते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या