जयपूरमध्ये झालेल्या लिलावात अनेख खेळाडूंना परत संघात घेतले. युवराज सिंगला खरेदी करून मुंबईने सर्वांनाच धक्का दिला आहे. याशिवाय मलिंगाला संघात घेण्यामध्ये मुंबई यशस्वी ठरले. यांच्याशिवाय अनमोलप्रीत सिंग आणि बरिंदर सरन यांना 3.4 कोटी रुपयांची बोली लावून संघात घेतले. तर राशिक डार आणि पंकज जयस्वाल यांनाही लिलावात घेतले आहे.
मुंबई, 20 डिसेंबर : आयपीएल लीगमधील सर्वात यशस्वी संघ म्हणून मुंबई इंडियन्सचे नाव घेतले जाते. मुंबई संघानं आतापर्यंत चारवेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहे. त्यामुळं आता रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली पाचव्यांदा विजेतेपदासाठी सज्ज झाला आहे. दरम्यान आयपीएलच्या लिलावात मुंबई संघाकडे सर्वात कमी रक्कम असल्यामुळं त्यांनी मोजक्या खेळाडूंकडे आपले लक्ष वेधले. मुंबईनं सर्वात आधी ऑस्ट्रेलियाच्या ख्रिस लीनला आपल्या संघात घेतले. कोलकाता संघानं रिलीज केल्यानंत ख्रिस लीनला लिलावाता मोठी रक्कम मिळेल असे वाटत असताना मुंबईनं लीनला 2 कोटींच्या बेस प्राईजवरच खरेदी केले. याशिवाय मुंबईनं सौरभ तिवारी (50 लाख), नॅथन कुल्टर नाइल (8 कोटी), मोहसिन खान (20 लाख) आणि दिग्विजय देशमुख (20 लाख) यांना खरेदी केले. या लिलावात मुंबई इंडियन्सनं 11.2 कोटी रुपये खर्च केले. वाचा- KKRने एका खेळाडूसाठी जितके पैसे मोजले तेवढ्यात मुंबई इंडियन्सने घेतले 6 जण रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सनं 4 वेळा आयपीएलचा किताब आपल्या नावावर केला आहे. अशी कामगिरी करणारा मुंबईचा संघ हा एकमेव संघ आहे. मुंबई 2013, 2015, 2017 आणि 2019मध्ये चॅम्पियन बनली आहेय. मुंबई संघानंतर महेंद्रसिंग धोनीच्या चेन्नई सुपरकिंग्ज संघाचा क्रमांक लागतो. चेन्नईनं तीन वेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहे. वाचा- सलग चारवेळा दहावीत झाला होता नापास, आता IPLनं केले मालामाल!
वाचा- रोहित शर्माला मिळाला नवा पार्टनर! मुंबई इंडियन्सनं ‘या’ स्टार खेळाडूला घेतले संघ मुंबईकडे शिल्लक रक्कम-1.95 कोटी टोटल स्लॉटः 1 ओवरसीज स्लॉटः 0 टॉप ऑर्डर फलंदाज: रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, क्विंटन डिकॉक, आदित्य तारे, अनमोलप्रीत सिंह, ख्रिस लिन. फिनिशर: किरन पोलार्ड, इशान किशन, शेरफने रदरफोर्ड, सौरभ तिवारी. ऑलराउंडर: हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या, प्रिन्स बलवंत राय. स्पिनर: राहुल चाहर, जयंत यादव, अनुकूल रॉय. जलद गोलंदाज: जसप्रीत बुमराह, लसिथ मलिंगा, ट्रेंट बोल्ट, धवल कुलकर्णी, मिशेल मॅक्लिनेगन, नॅथन कूल्टर नाइल, मोहसिन खान, दिग्विजय देशमुख. रिटेन खेळाडू: रोहित शर्मा, हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह, क्रुणाल पांड्या, इशान किशन, सूर्य कुमार यादव, राहुल चाहर, अनमोलप्रीत सिंह, जयंत यादव, आदित्य तारे, अनुकुल रॉय, धवल कुलकर्णी, क्विंटन डी कॉक, किरन पोलार्ड, शेरफेन रदरफोर्ड, लसिथ मलिंगा, मिशेल मॅक्लेनाघन, ट्रेंट बोल्ट. रिलीज केलेले खेळाडू: एविन लुईस, एडम मिल्ने, जेसन बेहरेंडॉर्फ, बेयूरन हेंड्रिक, बेन कटिंग, युवराज सिंग, बरिंदर शरण, रसिख सलाम, पंकज जसवाल, अल्जारी जोसेफ.