JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / मुंबईच्या विजेतेपदासाठी धोनीचा 'चॅम्पियन' उतरणार मैदानात?

मुंबईच्या विजेतेपदासाठी धोनीचा 'चॅम्पियन' उतरणार मैदानात?

चेन्नई आणि मुंबई यांच्यात होणाऱ्या आयपीएलच्या फायनलला रोहित शर्मा ‘या’ कारणासाठी संघात बदल करण्याची शक्यता आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 11 मे : आयपीएलच्या फायनलमध्ये चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यात सामना होणार आहे. हैदराबादच्या राजीव गांधी इंटरनॅशनल स्टेडियममध्ये हा सामना रविवारी होईल. चेन्नई आणि मुंबई यांच्यातील साखळी फेरीतील सामना सुद्धा हायव्होल्टेज असतो. आता दोन बलाढ्य संघांची लढत फायनलला होणार असल्याने त्याबाबत उत्सुकता वाढली आहे. दोन्ही संघ चौथ्यांदा विजेता होण्यासाठी मैदानात उतरतील. मुंबईचा संघ संतुलित असून यंदाच्या हंगामात त्यांना विजेतेपदाचे दावेदार मानलं जात आहे. तर दुसरीकडे आठवेळा फायनलला पोहोचलेल्या चेन्नईची फलंदाजी थोडी कमकुवत आहे. धोनीने नेतृत्व कौशल्याच्या जोरावर संघात वेळोवेळी बदल करून फायनलला धडक मारली. फायनलसाठी मुंबईचा संघ प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल करू शकतो. यात इशान किशनच्या जागी युवराज सिंगचा समावेश केला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. आय़पीएलमधील युवराजची कामगिरी पाहता त्याला संधी दिली जाईल असे मत व्यक्त केले जात आहे. महत्त्वाच्या सामन्यांमध्ये खेळण्याचा युवराज सिंगला अनुभव आहे. त्याने दबाव असेलल्या सामन्यांमध्येही संघाला विजय मिळवून दिला आहे. याबाबतीत इशान किशनचा अनुभव कमी आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने 2011 मध्ये आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कप जिंकला. तेव्हा युवराज सिंगला मालिकावीरचा पुरस्कार मिळाला होता. यंजाच्या आयपीएलमध्ये युवराजने 4 सामन्यात 130 स्ट्राइक रेटने 98 धावा केल्या आहेत. तर इशान किशनने 6 सामन्यात 105 च्या स्ट्राइक रेटने 78 धावा केल्या आहेत. शिवाय गोलंदाजीतही तो कमाल करू शकतो. आयपीएलच्या एका हंगामात दोन हॅट्ट्रिक घेण्याचा विक्रम युवराजच्या नावावर आहे. त्यामुळे युवराजला इशान किशनच्या जागी फायनलला संघात घेतलं जाऊ शकतं. वाचा- आयपीएलमुळं भंगलं ‘या’ खेळाडूचं वर्ल्ड कप खेळण्याचं स्वप्न, पण मुंबई इंडियन्स करणार मदत वाचा- IPL 2019 : ‘हे’ चार भारतीय खेळाडू ठरवतील फायनलचं भवितव्य SPECIAL REPORT: रायगड: राज ठाकरे इफेक्ट शिवसेना खासदाराला हॅट्रीकपासून रोखणार का?

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या