JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / Tokyo Olympics मध्ये मेडल जिंकणाऱ्या खेळाडूंचा भारतीय रेल्वेकडून होणार सन्मान, मिळणार 3 कोटीपर्यंतचा कॅश रिवॉर्ड

Tokyo Olympics मध्ये मेडल जिंकणाऱ्या खेळाडूंचा भारतीय रेल्वेकडून होणार सन्मान, मिळणार 3 कोटीपर्यंतचा कॅश रिवॉर्ड

ऑलिम्पिक्समध्ये जिंकणारे खेळाडू, भाग घेणारे खेळाडू आणि खेळाडूंच्या कोचला प्रमोशन्स, इंक्रिमेंट्स आणि स्पेशल कॅश अवॉर्ड्स, तसंच इतर अनेक पॉलिसींची सुविधा दिली जाणार आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 29 जुलै: टोकयो ऑलिम्पिक्स (Tokyo Olympics) दरम्यान रेल्वेने खास घोषणा केली आहे. टोकयो ऑलिम्पिक्समध्ये जिंकणाऱ्या, या स्पर्धेत भाग घेणाऱ्या खेळाडूंना आणि खेळाडूंच्या कोचसाठी रेल्वेने महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. ऑलिम्पिक्समध्ये जिंकणारे खेळाडू, भाग घेणारे खेळाडू आणि खेळाडूंच्या कोचला प्रमोशन्स, इंक्रिमेंट्स आणि स्पेशल कॅश अवॉर्ड्स, तसंच इतर अनेक पॉलिसींची सुविधा दिली जाणार आहे. खेळाडूंचं मनोबल वाढवण्यासाठी ही घोषणा केल्याचं रेल्वे मंत्रालयाने म्हटलं आहे. रेल्वेकडून गोल्ड मेडल जिंकणाऱ्या खेळाडूला 3 कोटी रुपये कॅश रिवॉर्ड देण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. तसंच सिल्व्हर मेडल पटकवणाऱ्या खेळाडूला 2 कोटी रुपये, ब्रॉन्झ मेडल विजेत्या खेळाडूला 1 कोटी रुपये कॅश रिवॉर्ड देण्यात येणार आहे. Tokyo Olympics मध्ये खेळाडू शेवटच्या आठ खेळाडूंमध्ये असल्यास त्यालाही पुरस्कृत केलं जाणार आहे. अशा खेळाडूंना 35 लाख रुपये दिले जातील. तसंच ऑलिम्पिक्समध्ये भाग घेणाऱ्या प्रत्येक खेळाडूला साडेसात लाख रुपये देण्यात येणार आहेत. केवळ खेळाडूचं नाही, तर त्यांच्या कोचला देखील कॅश रिवॉर्ड देण्यात येणार आहे. गोल्ड मेडल मिळवणाऱ्या खेळाडूच्या कोचला 25 लाख रुपये, सिल्व्हर मेडल मिळवणाऱ्या खेळाडूंच्या कोचला 20 लाख रुपये मिळणार आहेत. तसंच ब्रॉन्झ मेडल पटकावलेल्या खेळाडूच्या कोचला 15 लाख रुपये आणि ऑलिम्पिक्समध्ये भाग घेतलेल्या खेळाडूंच्या कोचला 7.5 लाख रुपये दिले जाणार आहे. Tokyo Olympics, Hockey: भारताने गोल्ड मेडलिस्ट अर्जेंटिनाला चारली धूळ, क्वार्टर फायनलमध्ये धडक भारतीय रेल्वे (Indian Railway) Tokyo Olympics Games मध्ये खेळाडूंसाठी 20 टक्क्यांपर्यंत योगदान देते. रेल्वे स्पोर्ट्स प्रमोशन बोर्डकडून टोकयो ऑलिम्पिक्स गेम्समध्ये 25 खेळाडू, 5 कोच आणि 1 फिजिओ सामिल आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या