कॅलिफोर्निया, 27 जानेवारी : बास्केटबॉलपटू कोबी ब्रायंटच्या मृत्यूमुळे क्रीडाविश्वात हळहळ व्यक्त केली जात आहे. मेरिकेतील कॅलिफोर्निया येथे एका हेलिकॉप्टर दुर्घटनेत मृत्यू झाला. कोबी ब्रायंट या दिग्गज बॉस्केटबॉलपटूच्या मृत्यूनंतर क्रीडाविश्वात हळहळ व्यक्त केली जात आहे. 41 वर्षीय कोबीसह त्याच्या 13 वर्षांच्या मुलीचाही या अपघातात मृत्यू झाला आहे. ब्रायंटच्या मृत्यूवर भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीनेही हळहळ व्यक्त केली आहे. विराटनं इन्स्टाग्रामवर फोटो पोस्ट करत, ‘‘या बातमीने मला मोठा धक्का बसला आहे. लहानपणीच्या अशा बर्याच आठवणी आहेत जेव्हा मी सकाळी उठून या ‘जादूगाराला’ कोर्टमध्ये खेळताना बघायचो. देव त्याच्या आत्म्याला शांती देवो. त्याच्या कुटुंबास हे दुःख सहन करण्याची शक्ती द्या”, असे भावपूर्ण कॅप्शन लिहिले. वाचा- हेलिकॉप्टर क्रॅशमध्ये दिग्गज बॉस्केटबॉलपटूसह 13 वर्षांच्या लेकीचा मृत्यू!
वाचा- न्यूझीलंडच्या खेळाडूने चहलला दिली शिवी, रोहित शर्मावर आली पळून जाण्याची वेळ तर, भारताचा उप-कर्णधार रोहित शर्माने, ‘महान खेळाडूंपैकी एक. कोबे ब्रायंट, त्यांची मुलगी आणि अपघातात ठार झालेल्या लोकांना श्रद्धांजली’, अशी पोस्ट केली.
वाचा- ‘केएल राहुलचं यष्टीरक्षण संघाला महागात पडणार, धोनीचं मौन समजण्यापलिकडे’ फक्त क्रिकेटपटू नाही तर बॉलीवुड स्टार रणवीर सिंह, अभिषेक बच्चन, लारा दत्ता भूपति, अर्जुन कपूर यांच्यासह प्रियंका वाड्रा यांनी कोबी ब्रायंटला श्रद्धांजली’ वाहिली.
वाचा- यष्टीरक्षक केएल राहुलने रचला इतिहास, धोनी-पंतला टाकलं मागे लॉस एंजलिसपासून 65 किमी अंतरावर कोबी ब्रायंटच्या मालकीच्या हेलिकॉप्टरचा अपघात झाला. त्यानंतर आग लागून हे हेलिकॉप्टर झाडांमध्ये कोसळलं. भयंकर मोठ्या आगीमुळं बचाव पथकाला मोठ्या अडथळ्यांचा सामना करावा लागला. अपघात इतका भीषण होता की हेलिकॉप्टरमध्ये कुणीही वाचू शकलं नाही. या अपघातात कोबी ब्रायंटसह त्याची 13 वर्षांची मुलगी आणि 9 जणांचा मृत्यू झाला. दरम्यान, हेलिकॉप्टरमध्ये आग नेमकी कशी लागली हे अद्याप स्पष्ट होऊ शकलं नाही. कोबी ब्रायंटने आपल्या 20 वर्षांच्या कारकीर्दीत अनेक विक्रम केले. कोबी ब्रायंटने नॅशनल बास्केटबॉल असोसिएशनकडून खेळताना 5 स्पर्धाही जिंकल्या. कोबी त्याच्या करिअरमध्ये 18 वेळा ‘एनबीए ऑल स्टार’ ठरला. तर, 2016मध्ये तिसऱ्या सर्वात मोठ्या ऑल स्टार खेळाडूनं निवृत्ती जाहीर केली. कोबी ब्रायंटने 2012 आणि 2008च्या ऑलिम्पिकमध्ये अमेरिकेसाठी दोन सुवर्णपदकेही जिंकली होती.