चिराग शेट्टी, सात्विक रानकीरेड्डी
बर्मिंगहॅम, 08 ऑगस्ट: पी. व्ही. सिंधू आणि लक्ष्य सेनपाठोपाठ बॅडमिंटनमध्ये भारतानं आणखी एका सुवर्णपदकाची कमाई केली आहे. भारताच्या सात्विक रानकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीनं पुरुष दुहेरीत सुवर्णपदक पटकावलं. त्यामुळे बर्मिंगहॅममध्ये भारतानं बॅडमिंटनमध्ये सोनेरी यशाची हॅटट्रिक साजरी केली. चिराग आणि सात्विकनं पुरुष दुहेरीच्या अंतिम सामन्यात इंग्लंडच्या बेन लेन आणि वॅन्डी सीन या जोडीचा 21-15, 21-13 असा पराभव केला