नवी दिल्ली, 20 नोव्हेंबर : बांगलादेश विरोधात कोलाकातामध्ये होणाऱ्या डे-नाईट कसोटी सामन्यानंतर वेस्ट इंडिजचा संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. भारत-वेस्ट इंडिज यांच्यात 6 डिसेंबरपासून टी-20 आणि एकदिवसीय मालिका होणार आहे. यासाठी 21 नोव्हेंबरला टी-20 आणि एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा होणार आहे. दरम्यान, भारत-वेस्ट इंडिज मालिकेसाठी रोहित शर्माला एकदिवसीय संघात स्थान मिळणार नसल्याच्या शक्यता वर्तवल्या जात आहे. रोहित शर्माच्या जागी भारताला मयंक अग्रवालच्या रुपात नवीन सलामीचा फलंदाज मिळू शकतो. मयंकने बांगलादेश विरोधात झालेल्या कसोटी सामन्यात दमदार द्विशतकी कामगिरी केली. त्यामुळे मयंकला लवकरच लॉटरी लागू शकते. तर, रोहित शर्मा 2019मध्ये सतत क्रिकेट खेळत आहे, त्यामुळं त्याला विश्रांती देण्याचा निर्णय निवड समिती घेऊ शकते. त्यामुळं रोहित वेस्ट इंडिजविरुद्ध होणाऱ्या तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार नाही. वाचा- ‘तू आम्हाला हवा आहेस!’, IPL लिलावाआधीच लागली युवराज सिंगवर बोली आयपीएलमध्ये 16, वर्ल्ड कपमध्ये 10, सलग चार कसोटी आणि डझनभर एकदिवसीय आणि टी-20 सामने यांमुळे रोहित शर्माचे वर्कलोड वाढले आहे. त्यासाठी निवड समितीच्या वतीनं रोहित शर्माला विश्रांती देण्याचा निर्णय दिला जाऊ शकतो. हा निर्णय पुढच्या वर्षी ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपच्या दृष्टीनं महत्त्वाचा आहे.
वाचा- कर्णधारपदाच्या मोहापायी क्रिकेटपटूनं निवृत्तीबाबत घेतला धक्कादायक निर्णय संघात होणार मोठे बदल 2019मध्ये रोहित शर्मानं प्रत्येक सामना खेळला आहे. त्यामुळं 15 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या एकदिवसीय मालिकेत रोहितच्या जागी मयंक अग्रवालला संधी मिळू शकते. कसोटी क्रिकेटमध्ये मयंकची आक्रमक शैली त्याच्यासाठी एकदिवसीय क्रिकेटमध्ये कामी येऊ शकते. त्याचबरोबर धोनी या मालिकेत खेळणार की नाही, याबाबत साशंकता कायम आहे. वर्ल्ड कप 2019नंतर धोनीनं भारतासाठी एकही सामना खेळलेला नाही. त्यामुळं वेस्ट इंडिज विरोधातही धोनीला संघात स्थान मिळण्याची शक्यता कमी आहे. त्याचबरोबर केएल राहुल आणि शिखर धवन याच्यांपैकी एकाला संधी मिळू शकते. तर ऋषभ पंतच्या जागी संजू सॅमसनला संघात जागा दिली जाण्याची शक्यता आहे. वाचा- क्रिकेटमधील नवं वादळ! 4 सामन्याच्या बंदीचा काढला राग; 9 चेंडूत केल्या 46 धावा असा आहे भारत-वेस्ट इंडिज दौरा 6 डिसेंबर 2019 - पहिला T20I, मुंबई 8 डिसेंबर 2019 - दुसरा T20I, तिरुवनंतपुरम 11 डिसेंबर 2019 - तिसरा T20I, हैदराबाद 15 डिसेंबर 2019 - पहिला ODI, चेन्नई 18 डिसेंबर 2019 - दुसरा ODI, विशाखापत्तनम 22 डिसेंबर 2019 - तिसरा ODI, कटक