धर्मशाला, 14 सप्टेंबर : भारतीय संघानं वेस्ट इंडिजला त्यांच्याच घरात नमवल्यानंतर आता मायदेशात दक्षिण आफ्रिकेशी दोन हात करण्यास सज्ज आहे. दरम्यान भारत-दक्षिण आफ्रिका यांच्या तीन टी-20 सामने होणार आहेत. यातील पहिला सामना धर्मशाला 15 सप्टेंबरला होणार आहे. ही मालिका भारतासाठी महत्त्वाची असणार आहे, कारण 2020मध्ये होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपच्या दृष्टीनं खेळाडूंकडे चांगली संधी असणार आहे. मात्र या सामन्यात पाऊस खोडा घालण्याची शक्यता आहे. भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यात होणारा पहिला टी-20 सामना रविवारी एचपीसीए क्रिकेट मैदानावर होणार आहे. या सामन्याआधी बीसीसीआयनं ट्विटरवरून एक फोटो अपलोड केला आहे. यात धर्मशालाचे पीच चांगली दिसत असली तर, काळे ढग असल्यामुळं पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. हवामान खात्यानुसार धर्मशालामध्ये सामन्यादरम्यान पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळं पहिल्याच टी-20 सामन्यावर पावसाचे सावट असल्यामुळं चाहत्यांचा सुपर संडे खराब होऊ शकतो. हिमाचल प्रदेशच्या हवामान खात्यानुसार येत्या पाच दिवसात काही भागांमध्ये पावसाची दाट शक्यता आहे. पावसामुळं खेळाडूंना करता आला नाही सराव आज दुपारी धर्मशालामध्ये काही प्रमाणात पावसाच्या सरी बरसल्या. त्यामुळं दक्षिण आफ्रिका आणि भारतीय खेळाडूंना सराव करता आला नाही. टीम इंडियाचा सलामीचा फलंदाज रोहित शर्मा केवळ 10 मिनिटं सराव करू शकला.
वाचा- टी-20 मालिकेत रोहित-विराटमध्ये होणार टक्कर, कोण मारणार बाजी? जलद गोलंदाजांना होणार फायदा पावसामुळं जर मैदानावर दव पडले तर त्याचा फायदा जलद गोलंदजांना होऊ शकतो. भारतानं टी-20 संघात जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार यांना विश्रांती दिली आहे. तर, खलील अहमद, दीपक चाहर, नवदीप सैनी या खेळाडूंना संघात जागा दिली आहे. त्यामुळं भारताची मदार ही युवा खेळाडूंवर असणार आहे. तीन टी20 सामन्यांची मालिका पहिला टी20 सामना 15 सप्टेंबर, धर्मशाला दुसरा टी20 सामना 18 सप्टेंबर, मोहाली तिसरा टी20 सामना, 22 सप्टेंबर, बेंगळुरू (सर्व सामने भारतीय प्रमाणवेळेनुसार सायंकाळी 7 वाजता सुरू होतील.) वाचा- भारत दक्षिण आफ्रिका टी20 मालिका रविवारपासून, जाणून घ्या वेळापत्रक टी 20 साठी भारतीय संघ विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, केएल राहुल, शिखर धवन, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, ऋषभ पंत, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, कृणाल पांड्या, वॉशिंग्टन सुंदर, राहुल चाहर, खलील अहमद, दीपक चाहर, नवदीप सैनी. वाचा- मुंबईकर अथर्व अंकोलेकरची ‘बेस्ट’ कामगिरी! सातव्यांदा भारतानं जिंकला आशियाई कप गणपती मंडपात नागिन डान्स करताना तरुण कोसळला, काही क्षणात सोडला जीव LIVE VIDEO