JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / New Zealand Test squad vs India: भारताच्या फलंदाजाचे कंबरडे मोडण्यासाठी किवी उतरवणार हुकुमी एक्का! न्यूझीलंडचा कसोटी संघ जाहीर

New Zealand Test squad vs India: भारताच्या फलंदाजाचे कंबरडे मोडण्यासाठी किवी उतरवणार हुकुमी एक्का! न्यूझीलंडचा कसोटी संघ जाहीर

1 फेब्रुवारीपासून या कसोटी मालिकेला सुरुवात होईल. यासाठी न्यूझीलंडने आपल्या 13 खेळाडूंना जाहीर केला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

वेलिंग्टन, 17 फेब्रुवारी : भारत-न्यूझीलंड यांच्यातील टी-20 आणि एकदिवसीय मालिकेनंतर आता कसोटी मालिका होणार आहे. 21 फेब्रुवारीपासून या कसोटी मालिकेला सुरुवात होईल. यासाठी न्यूझीलंडने आपल्या 13 खेळाडूंना जाहीर केला आहे. दरम्यान या संघात सर्वात खतरनाक अशा ट्रेट बोल्टने दुखापतीतून सावरत पुनरागमन केले आहे. तर, मिशेल सॅटरन या फिरकीपटूला संघातून डच्चू देण्यात आला आहे. भारत-न्यूझीलंड यांच्यात दोन कसोटी सामने होणार आहेत. यातील पहिला सामना 21 फेब्रुवारीपासून वेलिंग्टनला होईल. तर दुसरा सामना 29 फेब्रुवारीपासून सुरू होईल. याआधी भारत-न्यूझीलंड यांच्यात झालेल्या सराव कसोटी सामन्यात भारताच्या फलंदाजांना न्यूझीलंडच्या गोलंदाजींचा सामना करणे कठिण झाले होते. मात्र पहिल्या डावात हनुमा विहारी शानदार खेळीनंतर दुसऱ्या डावात पंतने 70 धावांची खेळी केल्या. त्यामुळं हा सराव सामना अनिर्णित राहिला. दरम्यान भारतीय संघात विराट कोणत्या खेळाडूंना संधी देणार हे पाहावे लागणार आहे. वाचा- इशांत शर्माची टीम इंडियात एन्ट्री, युवा खेळाडूचं पदार्पण लांबणार?

वाचा- शुभमन गिल फेल तर पंत, पृथ्वीचा कमबॅक! न्यूझीलंडविरुद्ध कोणाला देणार विराट संधी ट्रेंट बोल्ट हा सर्वोत्तम जलद गोलंदाज म्हणून ओळखला जातो. बोल्टच्या गोलंदाजीचा सामना करण्यासाठी भारताला अनुभवी फलंदाजांची गरज असणार आहे. रोहित शर्मा जखमी असल्यामुळं भारताला युवा सलामीवीरांना मैदानात उतरवावे लागणार आहे. मयंक अग्रवाल चांगला पर्याय असून त्यासोबत पृथ्वी शॉ किंवा शुभमन गील यांना संधी मिळू शकते. तर मधली फळी सांभाळण्यासाठी अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा आणि विराट कोहली असे शानदार पर्याय आहेत. वाचा- कसोटीमध्येही टीम इंडियाचं काही खरं नाही! 3 सलामीवीरांनी मिळून काढला 1 रन **भारताचा कसोटी संघ-**विराट कोहली (कर्णधार), मयंक अग्रवाल, पृथ्वी शॉ, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (उप-कर्णधार), हनुमा विहारी, वृद्धिमान साहा, ऋषभ पंत, आर. अश्विन, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, उमेश यादव, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, इशांत शर्मा **न्यूझीलंडचा कसोटी संघ-**केन विल्यम्सन (कर्णधार), टॉम ब्लन्डेल, ट्रेंट बोल्ट, कॉलिन डे ग्रॅंडहोम, काईल जेमिसन, टॉम लॅथम, डेरी मिशेल, हेन्री निकोलस, अजाझ पटेल, टीम साऊदी, रॉस टेलर, निल वॅगनर, बीजे वॉलटिंग.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या