JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / किवींच्या बोल्टने हिटमॅनच्या खेळीचा डाव त्याच्यावरच उलटवला, रोहितने सांगितला 'तो' किस्सा

किवींच्या बोल्टने हिटमॅनच्या खेळीचा डाव त्याच्यावरच उलटवला, रोहितने सांगितला 'तो' किस्सा

मॅचनंतर रोहितने किवींच्या ट्रेंट बोल्टने (Trent Boult) त्याला त्याच्याच युक्तीने कसे आउट केले याचा किस्सा शेअर केला आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

जयपूर, 18 नोव्हेंबर: टीम इंडियानं न्यूझीलंड विरुद्धच्या (IND vs NZ) टी20 सीरिजची विजयानं सुरूवात केली आहे. जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियममध्ये बुधवारी झालेल्या पहिल्या टी20 मॅचमध्ये भारतीय टीमनं 5 विकेट्सनं विजय मिळवला. सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) आणि कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) यांनी या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. मॅचनंतर रोहितने किवींच्या ट्रेंट बोल्टने (Trent Boult) त्याला त्याच्याच्या शिकवणीने कसे आउट केले. याचा किस्सा शेअर केला आहे. पूर्णवेळ कर्णधार म्हणून भारतासाठी पहिला टी20 आंतरराष्ट्रीय खेळताना, रोहित शर्माने चांगली सुरुवात केली, पण ट्रेंट बोल्टने रोहितचीच युक्ती वापरत त्याला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. रोहितने 36 चेंडूत 48 रन केल्या. मॅचनंतर रोहितने आउट कसा झाला याचा खुलासा केला. सामन्यानंतर रोहित शर्माने कबूल केले की ही एक युक्ती होती, जी त्याने मुंबई इंडियन्सच्या खेळादरम्यान किवी वेगवान गोलंदाजाला शिकवली होती, जी त्याच्याविरुद्ध सामन्यात वापरली गेली. रोहित शर्मा म्हणाला, “ट्रेंट बोल्ट आणि मी एकत्र खूप क्रिकेट खेळलो आहे. त्याला माझी कमजोरी माहीत आहे आणि मला त्याची. आमच्यात चांगलीच घासाघाशी झाली. तो काय करणार होता हे मला माहीत होतं. जेव्हा मी त्यांचा (मुंबई इंडियन्समध्ये) कर्णधार असतो, तेव्हा मी त्यांना नेहमी स्पष्टोक्ती करायला सांगतो. तो बाऊन्सर टाकणार आहे हे मला माहीत होतं, पण मी त्याला क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून जाण्याचा प्रयत्न करत होतो, पण दुर्दैवाने मला ते जमलं नाही. असे मत त्याने यावेळी व्यक्त केले. आणि या सामन्यातील विजयाने मी आनंदी असल्याचे रोहितने यावेळी म्हटले आहे. तसेच, “एक कर्णधार म्हणून मला आनंद आहे की आम्ही जिंकलो. काही खेळाडू हुकले, पण इतर खेळाडूंना त्यांची क्षमता दाखवण्याची संधी मिळाली. गोलंदाजांचे कौतुक करावे लागेल, ज्यांनी न्यूझीलंडला १८० धावांपर्यंत जाण्यापासून रोखले असे मतही रोहितने यावेळी व्यक्त केले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या