JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / मोठी बातमी! टी20 सीरीजमधून किवींचा कर्णधार केन विल्यमसन OUT, कोण सांभाळणार कर्णधारपद?

मोठी बातमी! टी20 सीरीजमधून किवींचा कर्णधार केन विल्यमसन OUT, कोण सांभाळणार कर्णधारपद?

न्यूझीलंडच्या दौऱ्याला 17 नोव्हेंबर पासून सुरुवात होणार आहे. तत्पूर्वी, न्यूझीलंडने (India vs New zealand) आपल्या संघाची घोषणा केली आहे.

जाहिरात

Kane Williamson

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 16 नोव्हेंबर: न्यूझीलंडच्या दौऱ्याला 17 नोव्हेंबर पासून (IND vs NZ) सुरुवात होणार आहे. आधी 3 टी20 आणि नंतर 2 कसोटी सामने खेळवले जातील. तत्पूर्वी, न्यूझीलंडने आपल्या संघाची घोषणा केली आहे. दरम्यान, मोठी बातमी समोर आली आहे. किवींचा कर्णधार केन विल्यमसन (Kane Williamson opts out of T20I series vs India) टीम इंडियाविरुद्ध टी20 सीरीज खेळणार नसल्याची माहिती समोर आली आहे. तर त्याच्याजागी कर्णधाराची जबाबदारी टिम साउदी (Tim Southee) ला दिली आहे. विल्यमसनने टेस्ट सिरीजच्या दृष्टीने टी-20 सिरीजपासून स्वतःला दूर केले आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील 3 टी-20 सिरीजनंतर 2 टेस्ट मॅच खेळवले जाणार आहेत. या सिरीजमधील पहिला सामना 25 नोव्हेंबरपासून कानपूरमध्ये होणार आहे. तर दुसरा सामना ३ डिसेंबरपासून मुंबईत होणार आहे. ही सिरीज जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा भाग असेल. त्यामुळेच विल्यमसनने यावर लक्ष केंद्रित करण्याच्या उद्देशाने टी-२० मालिका न खेळण्याचा निर्णय घेतला. न्यूझीलंडने भारताविरुद्धच्या टी-20 सिरीजसाठी 14 जणांचा संघ जाहीर केला आहे. या संघात फलंदाजीची जबाबदारी डॅरिल मिशेल, मार्टिन गप्टिल, ग्लेन फिलिप्स यांच्या खांद्यावर असेल. टीम साऊदी, ट्रेंट बोल्ट वेगवान गोलंदाजीचे नेतृत्व करेल. इश सोधी आणि मिचेल सँटनर फिरकी गोलंदाज म्हणून संघाला मजबूत करतील. टी20 वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम फेरीत पराभूत झाल्यानंतर 24 तासांनंतर विल्यमसन 15 सदस्यीय न्यूझीलंड संघासह सोमवारी संध्याकाळी जयपूरला पोहोचला. बुधवारी येथे पहिला T20 सामना खेळवला जाणार आहे. दुसरा T20 शुक्रवारी होणार असून शेवटचा सामना रविवारी होणार आहे. न्यूझीलंड क्रिकेटने एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, “कसोटी संघाचे विशेषज्ञ खेळाडू जयपूरमध्ये आधीच प्रशिक्षण घेत आहेत. विल्यमसन आता या गटात सामील होणार आहे. कारण त्याला कसोटी मालिकेवर लक्ष केंद्रित करायचे आहे.

 T20 सिरीजसाठी न्यूझीलंडचा संघ

मार्टिन गप्टिल, डॅरिल मिचेल, ग्लेन फिलिप्स, टिम सेफर्ट, मार्क चॅपमन, जिमी नीशम, काइल जेम्सन, इश सोधी, मिचेल सँटनर, टॉड अॅश्टेल, अॅडम मिल्ने, लॉकी फर्ग्युसन, ट्रेंट बोल्ट, टिम सौदी ( कर्णधार).

न्यूझीलंड दौऱ्यासाठी भारतीय टी20 संघ

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उप-कर्णधार), ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, इशान किशन, वेंकटेश अय्यर, युजवेंद्र चहल, आर अश्विन, अक्षर पटेल, आवेश खान, भुवनेश्वर कुमार, दीपक चाहर, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज.

टी20 सिरीज

पहिला सामना- बुधवारी 17 नोव्हेंबर, सवाई मानसिंग स्टेडियम, जयपुर, सायंकाळी सात वाजता दुसरा सामना- शुक्रवार, 19 नोव्हेंबर, जेएससीए इंटरनॅशनल स्टेडियम रांची, सायंकाळी सात वाजता सरा सामना- रविवार-21 नोव्हेंबर, ईडन गार्डन्स स्टेडियम कोलकाता, सायंकाळी सात वाजता

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या