JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / फलंदाजी ते गोलंदाजी, टीम इंडिया खमकेपणाने खेळली, दणकेबाज जिंकली, विंडीजचा खतरनाक पराभव

फलंदाजी ते गोलंदाजी, टीम इंडिया खमकेपणाने खेळली, दणकेबाज जिंकली, विंडीजचा खतरनाक पराभव

टीम इंडिया विरुद्ध वेस्ट इंडीज यांच्यातील पहिल्या टी 20 सामन्यात भारताचा धडाकेबाज विजय झाला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

IND vs WI 1st T20 Live News in Marathi, 29 July 2022 : टीम इंडिया विरुद्ध वेस्ट इंडीज यांच्यातील पहिल्या टी 20 सामन्यात भारताचा धडाकेबाज विजय झाला आहे. भारताने तब्बल 68 धावांनी विंडीजवर विजय मिळवला आहे. टीम इंडिया विरुद्ध वेस्ट इंडीज यांच्यातील पाच सामन्यांच्या टी 20 मालिकेतील आजचा पहिला सामना होता. या पाच सामन्यांच्या मालिकेत भारताची विजयी सुरुवात झाली आहे. आजचा सामना हा तारौबायेथील ब्रायन लारा क्रिकेट स्टेडियममध्ये खेळवण्यात आला. या पहिल्या सामन्यात वेस्ट इंडीजचा कर्णधार निकोलस पूरनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. विंडीजचा हा निर्णय त्यांच्या अंगलटी आला. कारण प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या भारतीय फलंदाजांनी विडींजच्या गोलंदाजांना धू-धू धुतलं. प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या भारतीय संघाने निर्धारित 20 षटकांमध्ये 6 बाद 190 धावा केल्या. भारतीय संघाकडून दिनेश कार्तिकने धडाकेबाज फलंदाजी केली. तसेच कर्णधार रोहित शर्माने अर्धशतक केलं. तर भारतीय संघाने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना विडींजचा संघ पहिल्या पाच षटकांतच गडगडला. अखेर भारताचा या सामन्यात 68 धावांनी विजय झाला. भारतीय संघाने दिलेल्या 191 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना विडींजच्या फलंदाजांची टीम इंडियाच्या गोलंदाजांपुढे पळता भुई थोडी झाली. विडींजची आश्वासक सुरुवात झाली. पण दुसऱ्या षटकापासून विंडीजचा डाव गडगडला. काही धावांच्या अंतरांवर एकामागे एक मातब्बर फलंदाज तंबूत परतू लागले. भारताच्या अर्शदीप सिंगने विंडीजचा पहिल्या गडीला तंबूत परत पाठवलं. वेस्ट इंडीजचा सलामीवीर कायले मेयर्स हा 15 धावा करुन बाद झाला. तो दुसऱ्या षटकात बाद झाला. त्यानंतर लगेच तिसऱ्या षटकाच्या शेवटच्या बोलवर जेसन होल्डर बाद झाला. रविंद्र जडेजाने त्याची शुन्यावर विकेट घेत तंबूत पाठवलं. विडींजची सहा षटकांमध्ये 3 बाद 42 धावा अशी परिस्थिती होती. कर्णधार निकोलस पूरन हा डाव सावरण्याच्या प्रयत्नात होता. पण 9 व्या षटकांत तोदेखील बाद झाला. त्यानंतर रोव्हमन पॉवेल बाद झाला. अवघ्या 82 धावांवर विडींजचा अर्धा संघ तंबूत परतला. त्यानंतर शिमरॉन हेटमायरदेखील स्वस्तात परतला. हेटमायरची विकेट ताजी असतानाच विडींजला सातवा झटका बसला. रवी बिश्नोईने ओडेन स्मिथची विकेट घेतली. त्यानंतर अर्शदीप सिंगने विंडीजचा आठवा गडी तंबतू परतला. अखेर 20 षटकांत 8 बाद 122 धावा इथपर्यंत विडींजच्या संघाला मजल मारता आली. टीम इंडियाकडून अर्शदीप सिंग, रविचंद्रन अश्विन आणि रवी बिश्नोई यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. तर भुवनेश्वर कुमार आणि रविंद्र जडेजा यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. ( विंडीजला क्लिन स्वीप, भारताचा 119 रन्सने दणदणीत विजय, मालिका जिंकली )

 भारतीय संघाची फलंदाजी सुरुवात चांगली झाली. सलामीवीर रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव यांनी पहिल्या विकेटसाठी 44 धावांची भागीदारी केली. सूर्यकुमारनंतर मैदानात आलेला श्रेयस अय्यरदेखील आज शुन्यावर तंबूत परतला. त्यानंतर आलेल्या ऋषभ पंत आणि रोहित शर्मा यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण दहाव्या षटकात भारतला तिसरा धक्का बसला. ऋषभ पंत 10 धावा करुन बाद झाला. त्यानंतर हार्दिक पांड्यादेखील शुन्यावर बाद झाला. पण या दरम्यान रोहित शर्माने शानदार अर्धशतक साजरं केलं. त्यानंतर 15 व्या षटकांत रोहित शर्मा बाद झाला. त्याने 44 चेंडूत 64 धावा केल्या. रोहित नंतर रविंद्र जडेजा आणि दिनेश कार्तिकने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण अल्झारी जोसेफने त्याचा बळी घेतला. त्यानंतर दिनेश कार्तिकने अश्विनसोबत डाव सावरत आपली धडाकेबाज फलंदाजी सुरुच ठेवली. दिनेश कार्तिकच्या फलंदाजीमुळे टीम इंडियाचा स्कोअर हा 20 षटकात 6 बाद 190 असा झाला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या