JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / नाणेफेकीत दोन कर्णधारांना हरवल्यावर विराटला आवरलं नाही हसू, पाहा VIDEO

नाणेफेकीत दोन कर्णधारांना हरवल्यावर विराटला आवरलं नाही हसू, पाहा VIDEO

भारताचा कर्णधार विराट कोहलीनं तिसऱ्या कसोटी सामन्यात नाणेफेक जिंकली. या सामन्यात आफ्रिकेने नाणेफेकीसाठी दोन कर्णधार मैदानात उतरवले होते.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

रांची, 19 ऑक्टोबर : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहलीसमोर नाणेफेकीवेळी आफ्रिकेच्या दोन कर्णधारांचे आव्हान होते. डुप्लेसीला गेल्या 9 सामन्यात नाणेफेकीत अपयश मिळालं होतं. त्यामुळे त्याच्यासोबत नाणेफेकीसाठीचा कर्णधार म्हणून टेंबा बाबुमा उतरला होता. तरीही विराटच त्यांच्यावर भारी पडला. यावेळी विराट कोहलीला हसू आवरलं नाही. नाणेफेकीसाठी एकूण तीन कर्णधार उतरले होते. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार फाफ डुप्लेसीला 9 सामन्यांमध्ये नाणेफेक जिंकता आलेली नाही. त्यामुळे नशीब आजमावण्यासाठी टेंबा बाबुमा त्याच्यासोबत नाणेफेकीसाठी आला होता. मात्र तरीही नाणेफेकीचा कौल विराटच्या बाजूने लागला. डुप्लेसी दहाव्यांदा आशियाई मैदानावर नाणेफेक हारला आहे.

संबंधित बातम्या

दरम्यान ही पहिली वेळ नाही आहे, जेव्हा फाफनं असे काम केले आहे. याआधी 2018मध्येही त्यानं अशी कामगिरी केली आहे. गेल्या वर्षी झिम्बाम्वेमध्ये झालेल्या सामन्यात त्यानं जेपी ड्युमिनीला टॉस जिंकण्यासाठी पाठवले आहे. त्यावेळी ड्युमिनीनं टॉस जिंकला होता. याआधी ऑस्ट्रेलियाच्या महिला संघातील कर्णधार मेग लेनिंगनं अशी रणनीती वापरली होती. या सामन्यात टॉस जिंकण्यासाठी एलिसा हीलीला पाठवण्यात आले होते. अरे हा तर चमत्कार! सामन्यात कॅच पकडताना दिसला सुपरमॅन, पाहा LIVE VIDEO भारतीय संघाने याआधीचे दोन्ही सामने जिंकून मालिका खिशात घातली आहे. विशाखापट्टणम इथं झालेल्या पहिल्या सामन्यात भारताने 203 धावांनी विजय मिळवला होता. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात एक डाव 137 धावांनी मोठा विजय भारतानं साजरा केला. आता रांचीतील कसोटी जिंकून क्लीन स्वीपच्या इराद्याने भारतीय संघ खेळेल. तिसऱ्या कसोटीत शाहबाज नदीमला इशांत शर्माच्या जागी संघात स्थान मिळालं आहे. भारत तीन फिरकीपटूंसह खेळणार आहे. कुलदीप यादवला दुखापत झाल्यानं नदीमला संधी मिळाली. त्याच्याशिवाय रविचंद्रन अश्विन आणि जडेजा यांच्यावर फिरकीची भीस्त असेल. वाचा : टीम इंडियाने अचानक कोलकात्याहून रांचीला बोलावलं, कसोटीत करणार पदार्पण भारतीय संघ : रोहित शर्मा, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली(कर्णधार) , अजिंक्य रहाणे, रिद्धिमान साहा, रवींद्र जडेजा, आर अश्विन, शाहबाज नदीम, उमेश यादव, मोहम्मद शमी दक्षिण आफ्रिकेचा संघ : डीन एल्गर, क्विंटन डिकॉक, जुबेर हमजा, फॉफ डुप्लेसि (कर्णधार), टेंबा बावुमा, हेनरिक क्लासेन, जॉर्ज लिंडे, डेन पीट, कगिसो रबाडा, एनरिच नॉर्तजे, लुंगी एनगीडी VIDEO : राज ठाकरेंचा चंद्रकांत पाटलांना थेट सवाल, म्हणाले…

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या