JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IND Vs ENG: देशातलं सर्वांत मोठं क्रिकेट ग्राउंड पहिल्या 'पिंक बॉल मॅच'साठी सज्ज; पाहा मोटेरा स्टेडियमचा दिमाख

IND Vs ENG: देशातलं सर्वांत मोठं क्रिकेट ग्राउंड पहिल्या 'पिंक बॉल मॅच'साठी सज्ज; पाहा मोटेरा स्टेडियमचा दिमाख

अहमदाबादमधल्या साबरमतीतल्या (Sabarmati) मोटेरा स्टेडियमवर भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या तिसरा कसोटी सामना खेळवला जाणार आहे.

जाहिरात

Motera cricket stadium

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

अहमदाबाद, 17 फेब्रुवारी:  क्रिकेटरसिक ज्या सामन्याची अत्यंत आतुरतेनं वाट पाहत आहेत, ती प्रतीक्षा लवकरच समाप्त होणार आहे. भारत आणि इंग्लंड (IND Vs ENG) यांच्यातल्या तिसरा कसोटी क्रिकेट सामना रंगणार आहे देशातल्या सर्वांत मोठ्या क्रिकेट ग्राउंडवर आणि तेही डे-अँड नाइट सामना. भारत इंग्लंड मालिकेतला तिसरा सामना अहमदाबादमधल्या (Ahmedabad) मोटेरा क्रिकेट स्टेडियमवर (Motera Cricket Stadium) होणार आहे. त्याची तिकिटं 24 फेब्रुवारीपासून मिळणार आहेत. हा सामना डे-नाइट (Day-Night Match) असेल. त्यामुळे या पिंक बॉल सामन्याची (Pink Ball Match) क्रिकेटरसिक वाट पाहत आहेत. अहमदाबादमधल्या साबरमतीतल्या (Sabarmati) मोटेरा स्टेडियमवर अनेक सामने झाले आहेत; पण आता त्याच स्टेडियमला नवा लूक देण्यात आला आहे. तितकंच नव्हे, तर मोटेरा स्टेडियम हे जगातलं सर्वांत मोठं स्टेडियम म्हणून ओळखलं जाणार आहे. ऑस्ट्रेलियातलं मेलबोर्न (Melbourne) स्टेडियम जगातलं सर्वांत मोठं क्रिकेट स्टेडियम असून, तिथे 92 हजार प्रेक्षक बसू शकतात. मोटेरा इथे नव्यानं बांधल्या जात असलेल्या स्टेडियममध्ये एक लाख 10 हजार प्रेक्षक सामन्याचा आनंद लुटू शकतात. मोटेरा स्टेडियममध्ये तीन हजार कार, तर 10 हजार बाइक्स पार्क होऊ शकतात. तसंच या स्टेडिययमध्ये 210 बाय 20 फूट या भव्य आकाराचे एलईडी स्क्रीन्सही उभारण्यात आले आहेत, जेणेकरून प्रेक्षकांना सामन्यातल्या प्रत्येक क्षणाचा आस्वाद घेता यावा. अन्य खेळांचा विचार करून त्या स्टेडियमसोबत एक क्लब हाउसही (Club House) बांधण्यात आलं आहे. पाच मजली क्लब हाउसमध्ये सर्व सोयींनी युक्त 55 खोल्या आहेत. बॅडमिंटन, कबड्डी, बॉक्सिंग, टेबल टेनिस, कराटे, बास्केटबॉल यांसारख्या खेळांसह स्विमिंग पूलची सुविधाही तेथे उपलब्ध आहे. प्रेक्षक आणि खेळाडूंच्या सोयीचा विचार करून जिम्नॅशियम, रेस्तराँ या सुविधाही उपलब्ध करण्यात आल्या आहेत. एवढंच नव्हे, तर प्रशिक्षण केंद्रही तेथे उभारलं जात आहे. हे वाचा - ICC Test Rankings: धोनीला जमलं नाही ते ऋषभ पंतने करून दाखवलं या स्टेडियममध्ये तीन मजली व्हीआयपी लाउंज (VIP Lounge) उभारण्यात आला असून, त्यात 76 स्पेशल रूम्स बांधण्यात आल्या आहेत. क्रिकेटपटूंसाठी एक मजला राखीव ठेवण्यात आला असून, त्यातल्या चार चेंजिंग रूम्स आहेत. मीटिंग रूम्स, कोच रूम्ससह चीअरलीडर रूम्स, मीडिया रूम, फूड कोर्ट अशी सर्व सज्जता तेथे राखण्यात आली आहे.

अवश्य वाचा -  IPL Auction 2021: जम्मू-काश्मीरच्या ‘या’ तीन खेळाडूंना आयपीएल लिलावात संधी

संबंधित बातम्या

विशेष लक्ष देऊन कॉमेंटरी रूम तयार करण्यात आली आहे. तसंच, खेळपट्टी (Pitch) तयार करण्यासाठी खास ऑस्ट्रेलियन सीड्स (Australian Seeds) आणण्यात आल्या आहेत. या स्टेडियमचं अन्य स्टेडियमपेक्षा असलेलं वैशिष्ट्य म्हणजे विशेष तंत्रज्ञान असलेले 580 एलईडी लाइट्स स्टेडियमच्या छपरावर बसवण्यात आलेले आहेत. एरव्ही ते खांबांवर बसवण्यात आलेले असतात. 100हून अधिक सीसीटीव्ही आणि 200हून अधिक महागडे स्पीकर्सही प्रेक्षकांच्या सोयीसाठी स्टेडियममध्ये बसवण्यात आले आहेत. अशा वैशिष्ट्यपूर्ण स्टेडियममध्ये होऊ घातलेल्या सामन्याची वाट क्रिकेटरसिक पाहत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या