नागपूर, 11 नोव्हेंबर : भारत-बांगलादेश यांच्यात झालेली टी-20 मालिका टीम इंडियानं 2-1नं खिशात घातली. पहिल्या सामन्यात मिळालेल्या मानहानीकारक पराभवानंतर टीम इंडियानं कमबॅ केला. दुसऱ्या सामन्यात रोहित शर्मानं 85 धावांची खेळी करत एकहाती सामना जिंकून दिला. तर, दुसऱ्या सामन्यात फलंदाजीमध्ये केएल राहुलनं 52 तर, श्रेयस अय्यरनं 62 धावा केल्या. या दोघांच्या खेळीच्या जोरावर भारतानं बांगलादेशला 174 धावांचे आव्हान दिले. बांगलादेश विरोधातल्या मालिकेत रोहित शर्मा आणि केएल राहुल यांनी केलेल्या अर्धशतकी खेळीचा फायदा दोघांना झाला. आयसीसी टी-20 रॅकिंगमध्ये या दोघांनी मोठी उडी घेतली आहे. मात्र भारतीय संघाचा कर्णधार विरोट काहलीला मोठा धक्का बसला आहे. वर्ल्ड कपनंतर दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज मालिकेत चांगली कामगिरी केल्यानंतर बांगलादेश विरोधात विश्रांती देण्यात आली होती. त्याचा फटका विराटला बसला. त्यामुळं ICC T20 Rankingच्या टॉप-10मधून विराट कोहली बाहेर पडला आहे. वाचा- VIDEO : अश्रूंचे झाले मोती, धोनीच्या संतापामुळे दीपक चाहर झाला डेथ ओव्हर किंग! बांगलादेश मालिकेचा कर्णधार रोहित शर्मानं तीन सामन्यात 96 धावा केल्या. यात दुसऱ्या टी-20 सामन्यात त्यानं 85 धावांची तुफानी खेळी केली. तर, केएल राहुलनं तीन सामन्यांमध्ये 75 धावांची खेळी केली. त्यामुळं आयसीसी टी-20 रॅकिंगमध्ये रोहित 8व्या स्थानावरून सातव्या स्थानावर आहे. तर, केएल राहुल 9व्या स्थानावरून 8व्या स्थानावर आला आहे. मात्र कर्णधार विराट कोहलीला मोठा फटका बसला. दहाव्या स्थानावर असलेला विराटला आता थेट 15व्या स्थानावर आला आहे. वाचा- चाहरचा कहर, हॅट्ट्रिकसह केली विश्वविक्रमाची नोंद
वाचा- असा आहे विराटचा रिटायरमेंट प्लॅन! करणार कधीही न केलेले काम तिन्ही फॉर्मेटमध्ये रोहितचा जलवा रोहित शर्मा फक्त भारतातील नव्हे तर जगातील सर्वोत्तम खेळाडू आहे. रोहितनं आयसीसीच्या एकदिवसीय, टी-20 आणि कसोटी क्रिकेटमध्येही जबरदस्त कामगिरी केली आहे. मात्र कसोटी रॅकिंगमध्ये विराट कोहली दुसऱ्या स्थानावर कायम आहे.तर, रोहित शर्मा सध्या कसोटीमध्ये नंबर 10, एकदिवसीय क्रिकेटमध्ये 2 आणि टी-20मध्ये 7व्या क्रमांकावर आहे.