शास्त्री यांनी डेली टेलीग्राफला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं की, ‘तो एक महान खेळाडू आहे. भारतातल्या महान क्रिकेटपटूंपैकी तो एक आहे. मी अजूनपर्यंत कोणत्याच व्यक्तीला एवढं शांत पाहीलं नाही मी अनेकदा सचिनला चिडलेलं पाहीलं आहे पण धोनी कधीच चिडत नाही.’
मुंबई, 14 मे : आयपीएलचे रणसंग्राम संपले असून मुंबईनं यात बाजी मारली. त्यामुळं आता सर्वांचे लक्ष लागले आहे ते, विश्वचषकाकडे. 30 मेपासून इंग्लंड आणि वेल्स येथे होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारतीय संघ सज्ज आहे. दरम्यान विजेतेपदाच्या दावेदारांमध्ये विराटसेना सध्या अव्वल क्रमांकावर आहे. दरम्यान या महत्त्वाच्या स्पर्धेसाठी बीसीसीआयनं 15 खेळाडूंची निवड केली, यावरून बरेच वाद झाले. मात्र आता यावर भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी, “भारतीय संघाला कोणत्याच चिंता नसल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच निवडलेला संघ हा सर्वोत्तम असून, तो संघ भारताला विश्वचषक जिंकवून देऊ शकतो”, असे मत व्यक्त केले. विश्वषकाकरिता निवड समितीने 15 सदस्यांचा संघ जाहीर केला. मात्र या संघात अंबाती रायडू आणि ऋषभ पंत यांना संधी न दिल्यामुळं अनेक वाद झाले होते. रायडू आणि पंत यांच्या बदली संघात विजय शंकर आणि दिनेश कार्तिक यांना संधी दिली आहे. त्यामुळं मधल्या फळीत कोण सक्षम फलंदाज आहे, असा सवाल चाहत्यांसह माजी खेळाडूही विचारत होते. दरम्यान आता या सगळ्या वादावर पहिल्यांदाच भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी आपले मत व्यक्त केले आहे. शास्त्री यांच्या मते, “ आमचा संघ लवचिक आहे. या संघात सर्वोत्तम खेळाडू आहेत. त्यामुळं चौथ्या क्रमांकासाठी कोण फलंदाजी करणार गा प्रश्न उद्भवतच नाही. चौथ्या क्रमांकावर खेळण्यासाठी हवे तेवढे पर्याय उपलब्ध आहेत”. शास्त्री यांनी क्रिकेटनेक्स्टला दिलेल्या मुलाखतीत संघाविषयी अनेक गोष्टींबाबत उलगडा केला.
तसेच शास्त्री यांनी केदार जाधव याच्या दुखापतीबाबतही मत व्यक्त केले. ते म्हणाले की, “केदार जाधवची ही दुखापत आणि कुलदीप यादवचा फॉर्म याबाबत मी जास्त चिंता करत नाही. जेव्हा संघसोबत मी 22 मे रोजी इंग्लंडसाठी रवाना होईल, तेव्हा त्या विमानात जे 15 खेळाडू असतील, त्यांचा विचार केले जाईल. आतापासूनच आम्ही कोणतीही योजना आखणार नाही’’. आयपीएलमुळं विराट कोहली बद्दल मत बदलणार नाही रवी शास्त्री यांनी याआधीही विराट कोहलीच्या कर्णधारपदाची प्रशंसा केली होती. शास्त्री यांच्या मते, विराट कोहलीनं गेल्या पाच वर्षांत खेळाडू म्हणून खुप चांगली प्रगती केली आहे. ते कोणीही नाकारु शकत नाही. त्याच्या क्षमता आहे, भारताला विश्वचषक जिंकवून देण्याची. तो धोनी सारखा संयमी नसला तरी, विराटचे रेकॉर्डस हे तो चांगला कर्णधार आहे हे दाखवून देतात. आयपीएलमुळं विराट वाईट कर्णधार होऊच शकत नाही. असा आहे भारतीय संघ : शिखर धवन, रोहित शर्मा, विराट कोहली, महेंद्रसिंग धोनी, केदार जाधव, हार्दिक पांड्या, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, लोकेश राहुल, दिनेश कार्तिक, विजय शंकर, रवींद्र जडेजा. वाचा- आयपीएलमध्ये भारताला सापडला ‘कॅप्टन कूल’, यानं केले विराटच्या कॅप्टन्सीला चॅलेंज वाचा- तुम्ही IPL पाहण्यात होता दंग, तर इंटरनेटवर गाजत होती मुंबईची ‘ही’ हॉट फॅन वाचा- World Cup : ‘ही’ एक चूक पडणार महागात, विराटला ‘गंभीर’ इशारा कुख्यात गुंडाचा ‘वाढीव’पणा, शस्त्रासह टिक टॉकवर बनवला VIDEO