लंडन, 01 जुलै : ICC Cricket World Cupमध्ये भारतीय संघाच्या विजयी घौडदौडीला इंग्लंडच्या संघानं फुलस्टॉप लावला. सात सामन्यांपैकी सलग 5 सामने जिंकेलेल्या भारतीय संघाचे मनोबल वाढले होते. मात्र त्यांना इंग्लंड विरोधात चांगली कामगिरी करता आली नाही. गुणतालिकेत भारतीय संघ 11 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. सेमीफायनलमध्ये आपले स्थान निश्चित करण्यासाठी त्यांना एका विजयाची गरज आहे. भारताची पुढची लढत बांगलादेश आणि श्रीलंका यांच्याविरोधात होणार आहे. यातील पहिला सामना मंगळवारी बांगलादेशविरोधात होणार आहे. हा सामना भारत आणि बांगलादेश दोन्ही संघासाठी महत्त्वाचा आहे. इंग्लंडविरुद्धचा सामना भारतानं 31 धावांनी गमावला त्यामुळं रनरेटचा फरक भारताला जास्त पडला नाही. तरीही भारताला उर्वरीत दोन सामन्यांपैकी किमान एक सामना जिंकावाच लागणार आहे अन्यथा भारताचा उपांत्य फेरीतील प्रवेश अन्य सामन्यांमधील निकालांच्या व अन्य संघांच्या रनरेटवर अवलंबून असेल. असे झाले तर भारत होणार वर्ल्ड कपबाहेर वर्ल्ड कपमध्ये भारताचे अजून दोन सामने बाकी आहे. भारत जर बांगलादेश आणि श्रीलंकेविरुद्धचा असे दोन्ही सामने हरला तर भारताचे गुण 11 राहतील. यामुळे बांगलादेशचे गुण 9 होतील. श्रीलंका आज वेस्ट इंडिज विरोधात लढत आहे. दरम्यान त्यांचे वर्ल्ड कपमधलं आव्हान जवळजवळ संपुष्टात आले आहे. दुसरीकडे बुधवारी इंग्लंड व न्यूझीलंड यांच्यामध्ये सामना रंगणार असून हा सामना जर इंग्लंड संघानं जिंकला तर 12 गुणांसह ते सेमीफायनलमध्ये प्रवेश करतील. भारतानंतर बांगलादेशचा पुढचा सामना पाकिस्तान विरोधात होणार आहे. त्यामुळं या सामन्यात बांगलादेशनं विजय मिळवल्यास त्यांचे 11 गुण होतील. तर, पाकिस्ताननं हा सामना जिंकला तर त्यांचे 11 गुण होतील. त्यामुळं ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, इंग्लंड आणि पाकिस्तान किंवा बांगलादेश हे चार संघ सेमीफायनलमध्ये प्रवेश करतील यामुळं भारताचे आव्हान संपुष्टात होतील. बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात होणार चित्र स्पष्ट भारताचा पुढचा सामना मंगळवारी बांगलादेश विरोधात होणार आहे. या सामन्यानंतर सेमीफायनलचे चित्र स्पष्ट होतील. बांगलादेश हा सामना जिंकला तर पाकिस्तानसाठी सेमीफायनल गाठणे कठिण जाणार आहे. तर, भारत हा सामना जिंकला तर, बांगलादेशचा आव्हान संपुष्टात येईल आणि भारत सेमीफायलनमध्ये आपले स्थान पक्के करेल. वाचा- इंग्लंडविरुद्धच्या पराभवानंतर भारताला दुसरा धक्का वाचा- ‘तुम्हाला ऋषभ पंत हवा होता ना, घ्या मग’; रोहितनं केली बोलती बंद वाचा- रोहितनं शतक झळकावलं, पण हिटमॅन दिसलाच नाही! SPECIAL REPORT : पहिला पाऊस…बघ तुला माझी आठवण येते का?