JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IND vs PAK : पाऊस पडला तरी काळजी नको ! फायदा तर टीम इंडियालाच होणार

IND vs PAK : पाऊस पडला तरी काळजी नको ! फायदा तर टीम इंडियालाच होणार

सध्या मॅंचेस्टरमध्ये पावसाला सुरुवात झाली आहे. जर पाऊस थांबला नाही तर त्याचा फायदा भारतालाच होऊ शकतो..

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मॅंचेस्टर, 16 जून : ICC Cricket World Cupमध्ये सर्व क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे ते भारत आणि पाकिस्तान या हायवोल्टेज सामन्यावर. या सामन्यात भारतानं तुफान फलंदाजी केली, मात्र 46व्या ओव्हरमध्येच सामना थांबला. पाकिस्ताननं टॉस जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला, मात्र हा निर्णय त्यांना महागात पडला. रोहित शर्मा आणि केएल राहुल यांनी 136 धावांची तुफान खेळी केली. यात रोहित शर्माची 140 धावांची शतकी खेळी खास ठरली तर, त्याला राहुलनं 57 धावा करत चांगली साथ दिली. सध्या कोहली 71 धावांवर खेळत आहे. मात्र, पावसामुळं खेळ थांबला आहे. ICC World Cupमध्ये यंदा पावसामुळं तब्बल चार सामने रद्द झाले. त्यामुळं भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांना एक-एक गुण देण्यात आले. मात्र, याचा फटका संघांना लीग स्टेजमध्ये बसू शकतो. सध्या भारतीय संघ गुणतालिकेत चौथ्या क्रमांकावर आहे. भारत-पाकिस्तान हा हायवोल्टेज सामना सध्या पावसामुळं थांबला आहे. याआधी यंदाच्या आयसीसी वर्ल्ड कपमध्ये याआधी पहिला सामना 7 जून रोजी पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यात रद्द झाला होता. त्यानंतर सोमवारी दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज यांच्यातला सामना रद्द झाला, हा सामना केवळ 7.3 ओव्हर खेळला गेला होता. त्यानंतर श्रीलंका-बांगलादेश यांच्यातला सामना रद्द झाला होता. त्यात गुरुवारी भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामनाही आता रद्द झाल्यामुळं चाहते आयसीसीवर संतापले आहेत. जर पावसामुळं सामने रद्द होणार असतील तर, खेळाडूंनी का खेळावे असा सवाल चाहते विचारत आहेत. live Update : ओल्ड ट्रैफर्डमध्ये ढगाळ वातावरण, अर्ध्या तासात होणार टॉस हवामान खात्यानं दिलेल्या माहितीनुसार मॅंचेस्टरमध्ये सध्या ढगाळ वातावरण आहे. त्यामुळं पावसाची शक्यता 50 % आहे. काही वेळानं पाऊस थांबू शकतो. मात्र आता पावसामुळं चाहते निराश झाले आहे.

संबंधित बातम्या

भारताचा फायदाच भारत-पाकिस्तान यांच्यातील सामन्यात भारताच्या फलंदाजीमध्येच पावसाचे आगमन झाले आहे. मात्र सध्या गुणतालिकेवर एक नजर टाकल्यास भारतानं दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाविरोधात चांगला विजय मिळवला आहे. त्यामुळं भारतीय संघ सध्या चौथ्या क्रमांकावर आहे. तर, न्यूझीलंडचा संघ सात गुणांसह पहिल्या क्रमांकावर आहे. सध्या वर्ल्ड कपमध्ये प्रत्येक संघ एकूण 9 सामने खेळणार आहेत. त्यातील सहा सामने जिंकल्यास त्या संघांना थेट सेमीफायनलचे तिकीट मिळणार आहे. पाकिस्तानसाठी असेल धोक्याची घंटा पाकिस्तानचा संघ सध्या गुणतालिकेत आठव्या स्थानावर आहे. त्यांना आतापर्यंत दोन सामन्यात पराभव स्विकारावा लागला आहे तर, एक सामना पावसामुळं रद्द झाला आहे, त्याचा फटका त्यांना बसू शकतो. 4 सामन्यात त्यांचे सध्या 3 गुण आहेत. त्यामुळं सेमीफायनल गाठण्यासाठी त्यांना रविवारचा सामना जिंकावा लागेल. त्यामुळं आता डर्कवर्थ ल्युईस नियम लागू झाल्यास पाकिस्तानला त्याचा फटका बसू शकतो. सामना सुरु होईल पण… भारत-पाकिस्तान सामना वेळेवर सुरु होणार आहे. मात्र हा सामना 50 षटकांचा होणार की नाही हे अद्याप निश्चित नाही. कारण सायंकाळी 5-7च्या सुमारास पावसाची शक्यता आहे. शनिवारी सतत होणाऱ्या पावसामुळं दोन्ही संघांना सराव करता आला नाही. मात्र, हा सामना सुरुवळीत पार पडावा यासाठी जगभरातून देवाला साकडे घातले जात आहे. वाचा- चाहत्यांसाठी मोठी बातमी, भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार नाही पण… वाचा- World Cup India vs Pakistan: या ठिकाणी पाहू शकता तुम्ही Live सामना वाचा- World Cup : इथं 20 वर्षांनी भारत-पाक लढत, वाचा कशी असेल खेळपट्टी आणि हवामान World Cup: IND vs PAK; परंपरा राखा विजयाची, धूळ चारूनी करा सरशी…

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या