साऊथॅम्पटन, 21 जून : जगातील वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये तयार करण्यात आलेल्या खेळपट्ट्या गोलंदाजांसाठी अनुकूल नसल्याचं म्हटलं आहे. गुरुवारी झालेल्या पत्रकार परिषदेत बुमराह म्हणाला की, इंग्लंडमध्ये पांढऱ्या रंगाच्या चेंडूसाठी खेळपट्टी तयार करण्यात आली आहे. या खेळपट्ट्या सपाट असल्याचंही बुमराह म्हणाला. मी आतापर्यंत जेवढं क्रिकेट खेळलो त्यावरून एक सांगू शकतो की इंग्लंडच्या खेळपट्ट्या सर्वाधिक सपाट आहेत. या खेळपट्टीवर गोलंदाजांना मदत होत नाही असं बुमराहने सांगितलं. इंग्लंडमध्ये ढगाळ वातावरण असतं. तेव्हा वाटतं की चेंडू स्विंग होईल पण ना वेग मिळतो ना स्विंग. यामुळे गोलंदाजी करताना कस लागतो. आम्हाला खेळपट्टीची कल्पना आहे. गोलंदाजी करताना सर्वात वाईट परिस्थिती असल्याचं मानून आपला सर्वोत्तम परफॉर्मन्स देण्याचा प्रयत्न करतो असंही बुमराह म्हणाला. सामन्यादिवशी खेळपट्टी पाहून संघाचे नियोजन करणं उपयुक्त ठरतं. जर या गोष्टींवर लक्ष दिलं नाही तर सामन्यादिवशी पहावं लागेल की काय योग्य राहिल. जर खेळपट्टीकडून मदत होत नसेल तर ताकदीवर लक्ष द्यावं लागेल असं बुमराहने सांगितलं. भारताचा पुढचा सामना साऊथॅम्पटनवर अफगाणिस्तानविरुद्ध होणार आहे. इथल्या मैदानाबद्दल जसप्रीत बुमराह म्हणाला की, याआधी साऊथॅम्पटनवर सामन्याच्या सुरुवातीला खेळपट्टी चांगली होती पण नंतर फलंदाजांना मदत होऊ लागली. नव्या चेंडूवर खेळपट्टी गोलंदाजांना मदत करणारी असते पण चेंडू जुना होताच गोलंदाजी कठीण होते. World Cup : अशी असेल भारतीय संघाची भगव्या रंगाची जर्सी, फोटो झाले व्हायरल वाचा- पांड्याचा खळबळजनक खुलासा, क्रिकेट आणि मुली नाही तर यात अडकला जीव वाचा- ‘तुमचा राग माझ्यावर काढू नका’, वीणानंतर नेटकऱ्यांवर भडकली सानिया सानियासाठी ‘रावळपिंडी एक्स्प्रेस’ उतरली मैदानात, ट्रोल करणाऱ्यांना खडसावलं